कधी पाहिलं नसेल असं! पालघरच्या शेतकऱ्याने पिकवलंय पिवळं धम्मक कलिंगड

कधी पाहिलं नसेल असं! पालघरच्या शेतकऱ्याने पिकवलंय पिवळं धम्मक कलिंगड

शेतकऱ्यानं इस्त्राइलच्या तंत्रज्ञानाचा वापर करत पिवळ्या कलिंगडाच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. ज्याने राज्यातील शेतकऱ्यांना नवा पर्याय मिळाला आहे.

  • Share this:

पालघर, 14 फेब्रुवारी - आतापर्यंत आपण लाल रंगाची कलिंगडं बघितली आहेत खाल्ली आहेत. बाहेरून हिरवं जर्द आणि आतून लालेलाल. कधी बाहेरून पोपटी रेघा असलेलं... शुगरबेबी. पण आता कलिंगडाचा लाल रंगच बदलला आहे. महाराष्ट्रातले शेतकरी सुद्धा नाविन्यपूर्ण असे प्रयोग करत आहेत. शेतीला आधुनिकतेची जोड देत आहेत. जगभरातील शेतीचं नवं तंत्रज्ञान नवे प्रयोग करत आहेत. आणि शेती अधिकाधिक समृद्ध करण्याचा ते प्रयत्न करतायत. असाच प्रयत्न केलाय पालघर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं हा प्रयोग केला आहे.

वाडा तालुक्यातील देवघर गावचे शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी कलिंगडाच्या शेतीत एक आधुनिक आणि संकरित प्रयोग केला आहे. आणि त्यांनी आपल्या शेतात चक्क पिवळ्या कलिंगाडाचं उत्पादन घेतलं आहे. हो अगदी खरं आहे पिवळं कलिंगड.

प्रफुल्ल पाटील या तरूण शेतकऱ्यानं आपल्या ५ एकर शेतीत पिवळ्या कलिंगडाची लागवड करून पालघर जिल्ह्यात नवा प्रयोग केलाय. एरवी हिरवी साल आणि आतून लालभडक कलिंगड पाहायची आपल्याला सवय आहे. मात्र आता सर्वांनाच ही पिवळी कलिंगडं खुणाऊ लागली आहेत. पाटील यांनी लागवड केलेल्या कलिंगडात दोन प्रकारची कलिंगडं आहेत. एका कलिंगडाची साल पिवळी आणि आतील गर लाल आहे. तर दुसरं हिरवी साल आणि पिवळा गर असलेली ही कलिंगडं बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

प्रफुल्ल पाटील यांना शेतीची आवड आहे. मात्र पारंपरिक शेतीतील अर्थशास्त्र शेतकऱ्याला शेतीपासून दूर जायला भाग पाडत आहे. त्यामुळे कमी साधनांमध्ये आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे वळण्यासाठी प्रफुल्ल पाटील ठिकठिकाणच्या प्रयोगशील शेतीची पहाणी करत असतात. नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात. अशातच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मागील वर्षी शेतकऱ्यांना शेतीच्या अभ्यासासाठी इस्राईलला पाठवलं होतं. त्या गटात जाण्याची संधी प्रफुल्ल पाटलांना मिळाली होती. इस्राईलमधील शेतीचं तंत्रज्ञान पाहून प्रभावित झालेल्या प्रफुल्ल पाटलांनी आपल्या शेतीत प्रयोग करण्याचा ध्यास घेतला. आणि ते जोरदार कामाला लागले. तंत्रज्ञानावर आधारित शेती करताना गुंतवणूकही मोठी होती. इस्राईलहून परतल्यानंतर सोसायटीकडून कर्ज घेतलं, कुटुंबियांचे दागदागिनेही गहान ठेवून संपूर्ण ५ एकराला ठिबक सिंचनाची व्यवस्था केलीय. त्याचबरोबर शेडनेट उभारून त्यात मिरचीची लागवड केली.

या पिवळ्या कलिंगडाच्या उत्पादनातून ते लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत.

अखेर पुण्यातील सविताभाभी होर्डिंग्सचं गुढं उलगडलं...पाहा व्हिडिओ

सही किया! छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना विद्यार्थिनींनीच दिला चोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2020 09:56 PM IST

ताज्या बातम्या