Home /News /maharashtra /

खूशखबर! पालघरच्या वाडा कोलम तांदळाला मिळाला 'जीआय टॅग'; परदेशातही आहे मोठी मागणी

खूशखबर! पालघरच्या वाडा कोलम तांदळाला मिळाला 'जीआय टॅग'; परदेशातही आहे मोठी मागणी

भौगोलिक संकेत टॅग (जीआय टॅग) मिळाल्यानंतर या तांदळाला विशेष मान्यता मिळेल आणि आता हा तांदूळ मोठ्या बाजारातही उपलब्ध होऊ शकतो. राज्याच्या एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने याबाबत आज माहिती दिली.

    मुंबई, 03 ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील वाडा (Wada Palghar) येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या तांदळाच्या वाडा कोलम (Wada kolam) प्रजातीला 'जीआय टॅग' देण्यात आला आहे. भौगोलिक संकेत टॅग (जीआय टॅग) मिळाल्यानंतर या तांदळाला विशेष मान्यता मिळेल आणि आता हा तांदूळ मोठ्या बाजारातही उपलब्ध होऊ शकतो. राज्याच्या एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने याबाबत आज माहिती दिली. विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी सांगितले की, 2 सप्टेंबर रोजी यासंदर्भात मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीत वाडा कोलम तांदळाला जीआय टॅग देण्याचा निर्णय घेण्यात आला. वाडा कोलम तांदूळ सामान्यतः जिनी किंवा झिनी तांदूळ म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. हा तांदूळ प्रामुख्याने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात उत्पादित केला जातो. या तांदळाचे दाणे शुभ्र पांढऱ्या रंगाचे असतात. माने यांनी दिलेल्या माहितीनुसार या तांदळाचा बाजारभाव 60-70 रुपये प्रति किलो असा आहे. हे वाचा - मंदिर परिसरता मुलाला लघुशंका करू दिली नाही, पोलिसाने पुजाऱ्याला केली मारहाण, बीडमधील घटना वाडा कोलम या विशिष्ट प्रकारच्या तांदळाला परदेशातही मोठी मागणी आहे. वाडा तालुक्यातील 180 गावांतील सुमारे 2500 शेतकरी या भात पिकाची लागवड करतात, असे वाडा कोलम तांदळाचे उत्पादक शेतकरी अनिल पाटील यांनी सांगितले. पाटील यांची तिसरी पिढी या तांदळाचे उत्पादन घेत आहे. जीआय टॅग म्हणजे काय? शेती, भौगोलिक, मशीन आणि मिठाई संदर्भातील उत्पादनाबाबत एखाद्या क्षेत्राला, व्यक्तींच्या गटाला आणि संघटनेला जीआय टॅगिंग दिलं जाते. एखादे उत्पादन एखाद्या भागातच उत्पादित होत असेल तर त्याला जीआय टॅग दिला जातो. हे वाचा - आईवडिल घोरत होते, बाळ गुदमरत होतं! नवजात बालकाच्या दुर्दैवी मृत्यूची करूण कहाणी जीआय टॅग देण्याचे उद्देश एखाद्या उत्पादनाला किंवा पदार्थाला जीआय टॅग मिळाल्यास दुसरे कोणी त्याची नक्कल करू शकत नाही. जीआय टॅग ही उत्पानाचं भौगोलिक ठिकाण दर्शवण्यासाठी देखील वापरले जाते. भौगोलिक संकेतक (नोंदणी आणि संरक्षण) कायदा 1999 नुसार जीआय टॅग दिला जातो. जीआय टॅगिंग उद्योग संवर्धन, अंतर्गत व्यापार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Palghar

    पुढील बातम्या