काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचं टार्गेट मनसे, 'या' तालुक्यात खिंडार

काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचं टार्गेट मनसे, 'या' तालुक्यात खिंडार

महत्त्वाचे नेते आपल्या पक्षात ओढून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा युतीचा प्रयत्न आहे.

  • Share this:

पालघर, 12 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले आहेत. महत्त्वाचे नेते आपल्या पक्षात ओढून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा युतीचा प्रयत्न आहे. अशातच आता शिवसेनेनं मनसेलाही धक्का दिला आहे.

वसईतील मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर आणि मनसेच्या माजी नगरसेविका सुषमा ठाकूर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे वसईत मनसेला चांगलाच धक्का बसला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या पक्षांतरामुळे वसईत मनसेची ताकद घटली आहे.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील हे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. बविआचे आणखी 5 ते 6 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा जनार्दन पाटील यांनी केला आहे. जनार्धन पाटील यांच्या पुढाकारानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विजय पाटील यांचाही मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश झाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आगरी सेनेच्या जनार्दन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 'बविआ'चे आमदार विलास तरे यांच्यासोबत आगरी जनार्दन पाटील यांनी हाती शिवबंधन बांधलं.

विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच विद्यमान आमदाराने पक्ष सोडल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण बोईसर विधानसभा मतदारसंघात आमदार विलास तरे यांची चांगली पकड आहे. तसंच शिवसेनेते प्रवेश केलेले आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील यांचाही स्थानिक मतदारांवर प्रभाव आहे.

VIDEO : कोकणात सेनेकडून राष्ट्रवादीला हादरा, रामदास कदमांनी केली 'ही' घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MNSpalghar
First Published: Sep 12, 2019 07:44 PM IST

ताज्या बातम्या