पालघरमध्ये एका झाडाने वाचवला 90 जणांचा जीव

पालघरमध्ये एका झाडाने वाचवला 90 जणांचा जीव

पालघरच्या मांजुर्ली येथे एका सरकारी बसला मोठा अपघात झाला आहे.

  • Share this:

पालघर, 01 ऑगस्ट : पालघरच्या मांजुर्ली येथे एका सरकारी बसला मोठा अपघात झाला आहे. पण ते म्हणतात 'ना देव तारी त्याला कोण मारी' याचाच प्रत्यय या अपघातात झाला आहे. टेम्भिखोडावेमधून सफाळ्याला येत असलेल्या बसला मांजुर्ली येथे अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने हुल दिल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस जागीच पलटी झाली. या बसमध्ये 90 प्रवासी प्रवास करत होते. पण सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

रस्त्याच्या कडेला झाड असल्यामुळे गाडी झाडाला धडकली आणि थांबली त्यामुळे मोठा अपघता टळला. या अपघातात 11 जण जखमी झाले आहेत.

Inspiration Story: एअर हॉस्ट्रेस आईची ‘अविस्मरणीय’ निवृत्ती, शेवटच्या दिवशी मुलीनेच उडवलं विमान

जखमींना सफालेजवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बस अपघात घडताच इतर प्रवाशांनी बसमधल्या प्रवाश्यांना तात्काळ बसमधून बाहेर काढलं. यात लहान मुलं देखील होती. पण सगळे जण यात सुरक्षित आहे. त्यामुळे एका झाडाने 90 जणांचे जीव वाचवले असं म्हणायला हरकत नाही.

गेल्या काही दिवसाआधीच रत्नागिरीमध्ये दापोली कृषी विद्यापीठाच्या एका खासगी बसला अपघात झाला आणि त्यात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रवास करताना आणि घाट असलेल्या ठिकाणी खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इतर प्रवाशांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचं काम सुरू आहे.

हेही वाचा...

आरक्षणाच्या आंदोलनांमुळे फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा

मुंबईत बांगलादेशी नागरिकांना शोधणं शक्य आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2018 10:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading