तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट

तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट

पालघरजवळच्या तारापूर एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट झालाय. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे 15 किमीचा परिसर हादरला.

  • Share this:

पालघर, 11 जानेवारी : तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, मृताचा आकडा 4 वर पोहोचला आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील m2 या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी ६.५० च्या सुमारास सुमारास भीषण स्फोट झाला असून या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह आठ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखली जाणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत कोसळल्याची माहितीपुढे आली आहे. तसंच या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

या कंपनीमध्ये  अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाचा आवाज २५ ते ३० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. डहाणू व पालघर पर्यंतच्या गावांमध्ये ते ऐकू आला. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा भास सुरुवातीला झाला. मात्र, काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचं स्पष्ट झालं.

या स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जखमी आणि मृत कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या आवारामध्ये आतापर्यंत  6 कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या आवारामध्ये काही रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे.

बडोद्याच्या कंपनीतही भीषण स्फोट

गुजरातमधील बडोदा येथील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

(हेही वाचा : चिमुकल्यांसाठी आईने केले मुंडण, केस विकून खरेदी केलं जेवण)

मिळालेली माहिती अशी की, AIMS इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटानंतर मोठा आवाज झाला. आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोट इतका भयंकर होता की कंपनीचे छत उडून दूर फेकले गेले आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आगही पसरली. त्यात 7 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत अधिकारी नसल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळी फायरब्रिगेडच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. तसेच ७ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. स्फोटाचे कारण मात्र अजूनही समोर आले नाही.

(हेही वाचा : साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, बुवाबाजीच्या मुद्द्यावरून परिसंवाद पाडला बंद)

====================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 08:01 PM IST

ताज्या बातम्या