मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दिवाळीची खरेदी जीवावर बेतली; 5 वर्षाच्या चिमुरड्यासोबत धक्कादायक घडलं

दिवाळीची खरेदी जीवावर बेतली; 5 वर्षाच्या चिमुरड्यासोबत धक्कादायक घडलं

बोईसर चिल्हार मार्गावर बोईसर खैरा फाटक येथील रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वर्षीय रियांश शिंदे या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला.

बोईसर चिल्हार मार्गावर बोईसर खैरा फाटक येथील रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वर्षीय रियांश शिंदे या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला.

बोईसर चिल्हार मार्गावर बोईसर खैरा फाटक येथील रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वर्षीय रियांश शिंदे या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

राहुल पाटील/पालघर, 25 ऑक्टोबर : बोईसर चिल्हार मार्गावर बोईसर खैरा फाटक येथील रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वर्षीय रियांश शिंदे या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. बोईसर औद्योगिक वसाहतीमधून निघालेल्या अवजड मालवाहू ट्रकची बुलेटला धक्का लागून ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने रियांशचा मृत्यू झाला. तर या अपघातात बुलेटवरील पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर लाइफ लाइन्स या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खड्डा चुकवताना बाईक आणि ट्रकची धडक झाली असून या अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमधील बोईसर चील्हार महामार्गावरील खैरा फाटक येथील रेल्वेच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात एका पाच वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. खड्डा चुकवताना अवजड ट्रकची बुलेटला धडक लागून ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने चिमूरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बुलेटवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बोईसर येथील अधिकारी लाईफ लाईन या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : काचेच्या बॉटलमध्ये फटाके फोडण्यावरून झाला वाद, 2 अल्पवयीन मुलांनी तरुणाच्या मानेत खुपसला चाकू

बोईसर मधील शिवाजीनगर येथे राहणार दांपत्य आपल्या पाच वर्षाच्या मुलासह बुलेटवरून बोईसर पूर्वेस असलेल्या डी मार्ट येथे दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी जात होते. मात्र बोईसर खैरा फाटक येथील रेल्वेच्या उड्डाणपुलावर त्यांच्यावर काळाने घाळा घातला. बोईसर खैरा फाटक येथील पुलावर असलेले खड्डे चुकवताना बुलेट आणि ट्रकची धडक झाली. यात बोईसर औद्योगिक क्षेत्रातून वायरचे बंडल घेऊन निघालेल्या अवजड ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने चिमूरड्याचा दुर्दैव असा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बोईसर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असला तरी ट्रकचालक ट्रक घटनास्थळीच सोडून फरार झाला आहे. बोईसर चिल्हार हा मार्ग एमआयडीसीचा असून या मार्गावर आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असून देखील एमआयडीसी बांधकाम विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतंय.

हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'घरात' गँगवारचा भडका, ठाण्यात 2 तासात 2 गोळीबार

या मार्गावर सध्या असलेलं खड्ड्यांच साम्राज्य, अनेक धोकादायक वळण, दुभाजकांची कमतरता, अनेक ठिकाणी तीन लेनच्या अचानक होणाऱ्या दोन लेन यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रमुख मार्गाच काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत असून या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मात्र बोईसर तारापूर एमआयडीसी बांधकाम विभाग या मार्गाचा ठेका असलेल्या कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीये. त्यामुळे कंत्राटदारासह एमआयडीसी बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवरही नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जातोय.

First published:

Tags: Accident, Bike accident, Major accident, Mumbai, Palghar, Truck accident