वीटभट्टीवर पोहोचला कोरोना, 3 वर्षाच्या मुलीला झाली लागण, अनेकजण संपर्कात आल्याने खळबळ

वीटभट्टीवर पोहोचला कोरोना, 3 वर्षाच्या मुलीला झाली लागण, अनेकजण संपर्कात आल्याने खळबळ

वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या 3 वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली.

  • Share this:

पालघऱ, 14 एप्रिल : सुरुवातील परदेशातून येणाऱ्या नागरिकांपर्यंत मर्यादित असलेला कोरोना विषाणू आता थेट वीटभट्टीपर्यंत जावून पोहोचला आहे. डहाणू तालुक्यातील गंजाड येथील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या 3 वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली.

सदर दाम्पत्य हे 5 एप्रिल पर्यंत आपल्या मुलीसह काटाळे येथे वितभट्टीच्या कामानिमित्त वास्तव्यास होते. तर कोरोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात न येता या चिमुकलीला कोरोना संसर्ग झाल्याने एकच खळबळ माजली आहे. खोकला, ताप व सर्दीचा त्रास जाणवत असल्याने तिला 5 तारखेला प्राथमिक आरोग्यकेंद्र मासवन येथे दाखवण्यास आणले होते. त्यावेळी त्या दाम्पत्याला मुलीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले होते

.मात्र त्यानंतर ते मुलीसह डहाणू तालुक्यातील गंजाड दसरा पाडा येथे गेले. 9 एप्रिल रोजी त्या मुलीला उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुलीच्या थुंकीचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या मुलीच्या संपर्कात आलेल्या डहाणू तालुक्यातील गंजाड दसरा पाडा येथील 16 लोकांना उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

हेही वाचा- 72 वर्षाच्या आजीपासून 12 वर्षांच्या मुलापर्यंत, 300 पोलिसांना जेवण देण्यासाठी कुटुंब सेवेत गुंतलं

पोलिसांनी सील केले पाडे

डहाणू पोलिसांनी गंजाड दसरा पाडा व आजूबाजूचे पाडे सील केले आहेत. तर मनोर पोलिसांनी पालघर तालुक्यातील काटाळे, लोहरे, निहे मासवन, वांदिवली ही गावे सील केली आहेत. पालघर तालुक्यातील काटाळे, मासवन या भागातील नर्स व डॉक्टरसह 13 लोक त्या मुलीच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 14, 2020, 2:12 PM IST

ताज्या बातम्या