नाशिकमधील 'लव्हली लेडीज' व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानींची घुसखोरी

नाशिकमधील 'लव्हली लेडीज' व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानींची घुसखोरी

नाशिक शहरातील सिडको परिसरात 'लव्हली लेडीज' हा महिलाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. अचानक बुधवारी सकाळपासून प्रत्येक लेडीजला पर्सनल मॅसेज सुरू झाले आहेत.

  • Share this:

प्रशांत बाग (प्रतिनिधी)

नाशिक, 12 जून- शहरातील सिडको परिसरात 'लव्हली लेडीज' हा महिलाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. अचानक बुधवारी सकाळपासून प्रत्येक लेडीजला पर्सनल मॅसेज सुरू झाले आहेत. ती सर्व लोक पाकिस्तानची असल्याचे समजते. ग्रुपमध्ये हे लोक कसे आले हे कोणालाही माहीत नाही. तसेच ग्रुपमधल्या महिलांचा एकमेकींना फोनही लागत नाही. त्यामुळे ग्रुपमधील सर्व महिलांना ग्रुपमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून अजून गुन्हा दाखल नाही. दरम्यान, पाकिस्तानातून दहशतवादी भारतात प्रवेश करतात. पण आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्येही पाकिस्तानची घुसखोरी सुरू झाली आहे. ग्रुपमधल्या युवकांना पाकिस्तानातून व्हिडिओ कॉल केले जात आहेत.

सतर्क राहण्याचे आदेश

या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप वापरताना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानातून व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्रमण करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाकिस्तानातून अश्लिल व्हिडिओचा भडिमार सुरू झाला. यामुळे ग्रुपमधील सदस्य घाबरून बाहेर पडले. या ग्रुपमध्ये पाकिस्तानी युवकांनी युवती असल्याचे भासवून काहींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अॅडमिनने हे क्रमांक काही काळातच ग्रुपमधून हटवले. मात्र काही युवकांना पाकिस्तानमधून व्हिडीओ कॉलही आले अशी माहिती सायबर सेलचे पीआय अशोक इंदलकर यांनी दिली आहे.

फेसबुकवरून काही दिवसांपूर्वी भारताच्या लष्करी जवानांना जाळ्यात ओढण्यात आलं होतं. त्यामुळे या अनुभवावरून व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तर आपण आपले नंबर कुठे शेअर करतो आणि कोणाला देतो याची माहिती असणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, ज्या नंबरवरून व्हिडिओ कॉल आले त्याचा पोलीस आणि सायबर सेलकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तर आपला नंबर कोणत्याही अ‍ॅपवर शेअर करण्याआधी अ‍ॅपसंदर्भात संपूर्ण माहिती घ्या असा सल्लाही सायबर सेलकडून देण्यात आलं आहे.

या सगळ्या प्रकारामागे नक्की कोणाचा हात आहे. यातून भारतीयांचा काही डेटा तर चोरला जात नाही ना याची माहिती घेण्याचं काम करण्यात येत आहे. पण या सगळ्या नागरिकांनी मात्र सतर्क राहण्याची गरज आहे.

SPECIAL REPORT : इम्रान खान यांच्यावर का आली मोदींसारखं पाऊल उचलण्याची वेळ?

First published: June 12, 2019, 9:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading