पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती झरदारींना अटक

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती झरदारींना अटक

कोर्टाचा आदेश आल्यानंतर झरदारींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर NABचं 15 सदस्यांचं पथक आणि पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.

  • Share this:

इस्लामाबाद 10 जून : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि बेनझीर भुट्टो यांचे पती असिफ अली झरदारी यांना आज भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली. कोर्टाने अटकेला रोखण्यास नकार दिला. हा आदेश आल्यानंतर नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरो (NAB)च्या पथकाने त्यांना अटक केली. झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचेही नेते आहेत.

कोर्टाचा आदेश आल्यानंतर झरदारींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर NABचं 15 सदस्यांचं पथक आणि पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. अटकेच्या वेळी झरदारी हे त्यांच्या इस्लामाबादच्या निवासस्थानी होते. अटकेआधी पोलिसांनी त्यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले होते.

झरदारी यांच्यासोबतच त्यांची बहीन  फरयाल तालपूर यांनाही अटक करण्यात आली. बनावट बँक खात्यांप्रकरणी ही अटक करण्यात आली. या अटकेमुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (PPP) अडचणीत वाढ होणार आहे.

2015 मध्ये विविध बँक खाते उघडून त्यात भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळालेला पैसा वळविण्यात आला. याच खात्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची कोट्यवधींची रक्कम झरदारी यांनी मिळवली असा त्यांच्यावर आरोप आहे.

पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान भेटणार का?

किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (SCO) बैठक आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सहभागी होणार आहेत. बैठकीदरम्यान हे नेते भेटणार का? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावर भारताने आता अधिकृत भूमिका स्पष्ट केलीय. पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांची कुठलीही भेट ठरलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत यापेक्षा जास्त भारताची काहीही प्रतिक्रिया नाही असं स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिलंय.

SCOच्या बैठकीची माहिती देण्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यात सगळ्यांनाच उत्सुकता होती ती मोदी आणि इम्रान खान यांच्या भेटीबद्दलची. गेली काही वर्ष भारताने दहशतवाद्याच्या मुद्यावरून पाकिस्तानसोबतची चर्चा थांबवलेली आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरुपात अधिकृत चर्चा होण्याची शक्यताच नाही. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध जास्तच ताणले गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Jun 10, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading