• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • SPECIAL REPORT : दीड तास नदीच्या पाण्याखाली श्वास रोखून रेखाटले शिवरायांचं चित्र!

SPECIAL REPORT : दीड तास नदीच्या पाण्याखाली श्वास रोखून रेखाटले शिवरायांचं चित्र!

पाण्याखाली राहून श्वास रोखत चित्र रेखाटताना त्याला 163 वेळा पाण्याबरोबर येऊन श्वास घ्यावा लागला.

  • Share this:
चिपळूण, 27 जून : प्राणी, पक्षी, राजकीय नेते दैवदेवता यांची हुबेहूब चित्र काढणारी वेगवेगळे चित्रकार (Painter) आपण पाहिलेत. पण पाण्याखाली जाऊन श्वास रोखून दगडावर छत्रपती शिवाजी महाराज व शिव महादेव यांचे पेंटींग काढणारा अवलिया कधी पाहिले आहे का?    रत्नागिरी (ratanagiri) जिल्ह्यात चिपळूण (chiplun) तालुक्यात सावर्डे येथे विजय शिंदे (vijay shinde) नावाचा असा एक अवलिया आहे. ज्याने नदीपात्रात पाण्याखाली जाऊन श्वास रोखत छत्रपती शिवाजी महाराज व शिव महादेव यांचे दगडावर पेंटींग करून अनोखा विक्रम केला आहे. चिपळूणमधील कुशिवडे गावातील विजय शिंदे (vijay shinde) याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावर्डेत त्याचा स्टुडिओ आहे. त्याला लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे त्याने आतापर्यंत विविध चित्र काढली. पण काही तरी वेगळं करण्याची त्यांची जिद्द असल्यामुळे त्याने पाण्याखाली जाऊन पेंटींग करण्याचा विचार केला. त्यानुसार, रत्नागिरी येथील जयगडनदीत पाण्याखाली 3 फूट खोल जाऊन त्याने एका दगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेंटींग काढण्यास सुरुवात केली. यावेळी एका दगडावर कोळशा आणि रंगीत खडूच्या साह्याने चित्र रेखाटले. हे चित्र रेखाटण्यासाठी त्याला 1 तास 39 मिनिटे लागली पाण्याखाली राहून श्वास रोखत चित्र रेखाटताना त्याला 163 वेळा पाण्याबरोबर येऊन श्वास घ्यावा लागला. त्याने हे चित्र दगडावर रेखाटताना कोणत्याही प्रकारच्या स्विमिंग उपकरणाचा म्हणजेच ऑक्सीजन सिलेंडर, स्विमिंग गॉगल्स इत्यादीचा वापर केला नाही. असा प्रकारे प्रथमच पाण्याखाली जाऊन दगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटून महाराजाना एक आगळी वेगळी सलामी दिली. त्यातून एक नवा विक्रम केला. 1 ऑक्टोबरपासून वाढणार तुमचा खर्च, LPG गॅसच्या किंमतीत होणार मोठी वाढ सोशल मीडियावर त्याने तो व्हिडीओ अपलोड करताच अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर मारली त्यातून  चित्रकार विजय शिंदेचा आत्मविश्वास वाढला आणि जयगडच्या नदीत पुन्हा त्याने पाण्याखाली जाऊन एका दगडावर शिव महादेवची पेंटींग काढली. यासाठी त्याला 43 मिनिटे लागली तर 73 वेळा पाण्याबाहेर येऊन त्याने श्वास घेतला तोही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाण्याखाली जाऊन श्वास रोखत दगडावर पेंटींग करण्याचा विक्रम करणारा विजय शिंदेची गिनीज बुकात नोंद व्हावी, असा अनेकांचा मानस आहे.
Published by:sachin Salve
First published: