पुणे, 24 फेब्रुवारी : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रकरणात वाढ होत आहे. सोसायटीत विनापरवाना भाजीविक्रेत्याला हटकले असता त्याने पैलवान बोलवून सभासदांना मारहाण केल्याची घटना कात्रजमध्ये घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यातील कात्रज आंबेगाव परिसरातील गणंजय सोसायटीत काही पैलवानांनी सोसायटीतील सभासदांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या सोसायटीत विनापरवाना एक भाजीविक्रेता भाजी विकत होता. सोसायटीतील सदस्यांनी त्या भाजीविक्रेत्याला विनापरवाना भाजी विक्री करु नये, असं सांगितलं. सदस्यांनी आपल्याला असं सांगितल्याचा त्याचा राग मनात ठेवून त्याने काही पैलवानांना सोबत आणले आणि सभासदांना मारहाण केली. लाठ्या काठ्याने सभासदांना मारहाण करण्यात आली. एवढंच नाहीतर या गुंडांनी तेथिल डेअरीची तोडफोडही केली.
पुणे : भाजी विक्रेत्याला हटकले, पैलवानांनी केली सोसायटीच्या सभासदांना मारहाण pic.twitter.com/E4l9Fex19u
— News18Lokmat (@News18lokmat) February 24, 2020
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पाच ते सहा पैलवानांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. हा सगळा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीत रात्री झालेली मारहाण दिसत आहे. या आधारे भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.
कुणीतरी फेकून दिलेली चपाती त्यानं धुवून खाल्ली, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. तसंच ताटात अन्न टाकू नये असंही सांगितलं जातं. अनेकदा मोठमोठ्या समारंभामध्ये अन्नाची प्रचंड नासाडी होते. त्याचवेळी काही लोक असेही असतात ज्यांना एकवेळ जेवण मिळत नाही. आता असाच एका वृद्धाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये वृद्ध चक्क चपाती धुवून खाताना दिसत आहे. मन हेलावून टाकणारा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ भारतातला असला तरी नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे समजू शकलेलं नाही. एका रेल्वेस्टेशनवर तो असल्याचं दिसतं. त्याच्या हातात चपाती असून तो नळावर येऊन चपाती धुत असल्याचं दृश्य दिसतं. चपाती धुतल्यानंतर ती खात असलेलंही व्हिडिओमध्ये दिसतं. एक हात अधु असलेल्या त्या वृद्धाचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
ये भूख ही तो है,
जो किसी से पेट भरने पर रोटी फ़िकवा देती है और किसी से उसी रोटी को दुबारा उठवा के धुलवा लेती है।
हृदय विदारक विड़िओ... pic.twitter.com/joG423khdE
— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) February 20, 2020
ट्विटरवर एका युजरने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, करत ‘ये भूख ही तो है, जो किसी से पेट भरने पर रोटी फिकवा देती है और किसी से उसी रोटी को दुबारा उठवा के धुलवा लेती है’त्यावर अनेकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशी वेळ कोणावर येऊ नये अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
व्हिडिओतील वृद्धाबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. चपाती धुवून खाण्याची वेळ त्याच्यावर का आली? चपाती कुठून आणली? कचऱ्यात होती का याबद्दल काहीच माहिती नाही. मात्र त्याच्या या व्हिडिओने अन्न नासाडी करणाऱ्यांसाठी एक मेसेज जरुर दिला आहे.