दुष्काळावर मात करण्यासाठी आलंय 'तुफान', गावकरी करताहेत रात्रीचा दिवस

दुष्काळावर मात करण्यासाठी आलंय 'तुफान', गावकरी करताहेत रात्रीचा दिवस

'पावसाच्या धावणाऱ्या पाण्याला अडवणं, अडवलेल्या पाण्याला रांगायला लावणं आणि प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणं गरजेचं आहे.'

  • Share this:

हर्ष महाजन, नागपूर 28 मे : राज्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी अमीर खानच्या पानी फाऊन्डेशनकडून सुरू असलेल्या कामांमुळे अनेक गावांमध्ये तुफान आलंय. दिवसा प्रचंड उन असल्याने गावकरी रात्री उशीरापर्यंत श्रमदान करत असून पावसाचा परत्येक थेंब अडवण्यासाठी ते कामाला लागले आहेत.

वॉटर कप स्पर्धेसाठी नागरिकांचा लोकसहभाग बघता या स्पर्धेला एका चळवळीचे रूप आले आहे. या वर्षी या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 76 तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला. त्यात नागपूर जिल्ह्यातील 74 गावांचा समावेश आहे.गेल्या 45 दिवसांपासून प्रत्येक गावाच्या नागरिकांनी सामूहिक श्रमदान करून आपआपल्या गावातील दुष्काळ नाहीसा करण्याचा प्रयत्न केला.

नरखेड तालुक्यातल्या खरसोली गावात तर ग्रामस्थ रात्री उशीरा 2 वाजेपर्यंत गावातील रानवनात कुदळ फावडे घेऊन काम करत आहेत. यात तरुण मुलं व महिलांचा विशेष सहभाग मिळत आहे.  गावाच्या पाणलोट क्षेत्रात चर खणने, दाडी बांध , शेततळे बांधने , नाला खोलीकरण करणे, विहिरींचा गाल काढणे अशी  कामं नागरिक श्रमदानातून करत आहेत.

नागपूर जिल्हा परिषदने देखील या कामात मदत करत आहे.  जिल्हा परिषदच्या कार्यकारी अधिकाऱ्यांपासून जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व ग्रामसेवकांपर्यन्त आपली यंत्रणा राबवून ग्रामपंचायत माध्यमातून स्पर्धेत सहभागी गावांना आर्थिक व यांत्रिकी मदत केली. त्यामुळे जल संधारणाची कामात अधिक वेग आला. रात्रीचे दौरे करूनही अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रोत्साहन दिले.

राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार?

राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी उपाय योजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. त्यासाठी एरियल क्लाऊड सीडींग (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यात येणार आहे.

राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी पर‍स्थ‍िती असून बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पावसात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपायांचा अवलंब करण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे. कृत्रिम पर्जन्यमान हा त्यातलाच एक भाग आहे. सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याने आज मंत्रिमंडळाने एरियल क्लाऊड सीडिंग करून पर्जन्यवाढ करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 30 कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे.

परदेशात एरियल क्लाऊड सीडींगच्या प्रयोगातून 28 ते 43 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान वाढल्याचे आढळून आले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात क्लाऊड सीडींगच्यामाध्यमातून पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे सी बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे.

First published: May 28, 2019, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading