मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लॉकडाऊनमध्ये पैशांसाठी केला सगळ्यात भयंकर जुगाड, स्वत: कार लपवली आणि....

लॉकडाऊनमध्ये पैशांसाठी केला सगळ्यात भयंकर जुगाड, स्वत: कार लपवली आणि....

अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी पैशांचे आणि कामाचे जुगाड केले असतील. असाच एक भयंकर जुगाड बारामतीमधून समोर आला आहे.

अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी पैशांचे आणि कामाचे जुगाड केले असतील. असाच एक भयंकर जुगाड बारामतीमधून समोर आला आहे.

अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी पैशांचे आणि कामाचे जुगाड केले असतील. असाच एक भयंकर जुगाड बारामतीमधून समोर आला आहे.

बारामती, 23 जुलै : राज्यावर कोरोनाचं संकट असल्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. अशात अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी पैशांचे आणि कामाचे जुगाड केले असतील. असाच एक भयंकर जुगाड बारामतीमधून समोर आला आहे. विम्याची रक्कम मिळावी म्हणून स्कॉर्पिओ कार मालकानेच कार चोरीला गेल्याची तक्रार बारामती पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी या कारचा शोध लाऊन तक्रार करणाऱ्या मालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या बाबत बारामती तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ सारखी गाडी चोरीला गेल्याच्या घटनेनंतर पोलिसही चक्रावून गेले. पण गाडी चोरीची फिर्याद आली म्हटल्यावर त्याचा वेगानं तपास सुरु करण्यात आला. अनेक दिशेने तपास करुनही पोलिसांना काहीच हाती लागलं नाही. त्यानंतर पोलिसांनी उलट पध्दतीने त्याचा तपास सुरु केला. तेव्हा हा तपास असा काही खुलासा झाला की पोलिसही चक्रावले. पुण्यातल्या या दोन ठिकाणी फक्त 4 तास उघडणार दुकानं, आज रात्रीपासून नियम लागू पोलीस चोरीची फिर्याद दिलेल्या मालकापर्यंत एखाद्या चित्रपटात दाखवल्यासारखे पोहोचले. अशी ही घटना बारामती तालुका पोलीस स्टेशनला घडली असून 28 जून रोजी जमाल मोहमंद अब्दुल सय्यद (वय 40, रा. महादेव मळा, बारामती) याने कार चोरीला गेल्याची फिर्याद दिली. त्यांची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ चोरीला गेलेली आहे. कारचे दरवाजाचे लॉक तोडून कार चोरीन नेल्याची त्याने तक्रार दिली होती. वहिनीनं शेतात बोलावलं म्हणून कुऱ्हाडीने केले वार, नंतर दिराचा धक्कादायक प्रयत्न
बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक योगेश लंगुटे आणि त्यांच्या पथकानं याचा तपास सुरु केला. कार चोरीस झाल्यानंतरची सीसीटीव्ही फूटेज तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारही तपासले जातात. अनेक प्रयत्न करुन पोलिसांना कुठलाही सुगावा लागत नाही म्हटल्यावर, पोलिसांनी याचा तपास उलट्या दिशेने शोध सुरु केला. वहिनीनं शेतात बोलावलं म्हणून कुऱ्हाडीने केले वार, नंतर दिराचा धक्कादायक प्रयत्न या कारमधील पैश्याच्या सर्व तांत्रिक बाबीं तपासल्यानंतर खरी माहिती समोर आली. घटना घडली तेव्हा फिर्यादी त्या ठिकाणी गेलेलाच नव्हता. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती काढली असता विम्याचा लाभ मिळविण्यासाठी गाडी चोरीला गेली असल्याची खोटी तक्रार दिल्याचं स्पष्ट झालं. ही कार सलमान शेख (रा. कोष्टी गल्ली, बारामती) इथं पार्किंगमध्ये लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन ही स्कॉर्पिओ कार जप्त केली आहे. यातील तक्रार देण्यारा फिर्यादी जमाल मोहमंद अब्दुल सय्यद यांनी विम्याचा लाभ मिळविण्यासाठी खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली असल्याचं योगेश लगुंटे यांनी सांगितले असुन पोलिसांनी आता कारवाई केली आहे.
First published:

Tags: Baramati, Coronavirus

पुढील बातम्या