कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट, राज्यातला बळीराजा हतबल

कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट, राज्यातला बळीराजा हतबल

लॉकडाऊनमुळे तर आर्थिक अडचणींचं आभाळ कोसळलं. त्यात राज्यावर आसमानी संकट आलं. आताही राज्याच्या पोशिंद्यावर व्हायरसचं मोठं संकट कोसळलं आहे.

  • Share this:

जळगाव, 28 ऑगस्ट : एकीकडे कोरोना व्हायरमुळे राज्यावर मोठं संकट ओढावलं आहे. अशात लॉकडाऊनमुळे तर आर्थिक अडचणींचं आभाळ कोसळलं. त्यात राज्यावर आसमानी संकट आलं. आताही राज्याच्या पोशिंद्यावर व्हायरसचं मोठं संकट कोसळलं आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर हा भाग केळी उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या ग्रीन बेल्टमध्ये कुकुंबर मोझाक व्हायरस (सीएमव्ही) रोगाने हाहाकार माजला आहे.

अवघं महाबळेश्वर निघाला होता विकायला, पोलिसांनी असा उधळला सगळ्यात मोठा कट

यावर्षीही पुन्हा हा व्हायरसने डोके वर काढल्याने केळीची रोपे उपटून फेकण्याची वेळ केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या रोगामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून हे टिश्यू कल्चर केळी रोपे जैन या जळगावातील प्रसिद्ध कंपनीचे असून या रोपांमध्ये कुठल्याही प्रकारची रोग प्रतिकारक शक्ती कंपनीने तयार केली नाही.

वडिलांनीच संपवला लेकाचा 5 वर्षांचा संसार, सुनेला कुऱ्हाडीने वार करून केलं ठार

यामुळे 3 वर्षांपासून हा रोग जास्त थैमान घालत आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे. जुलै महिन्यात लागवड केलेल्या टिश्यू कल्चर रोपांवर या रोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, जिल्ह्यातील किमान दोन हजार हेक्टर्स केळीवर हा रोग आला आहे.

पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक, अपघातात 4 जण ठार

यातील किमान दोनशे हेक्टर्स केळी शेतकऱ्यांनी उपटून फेकली आहेत. संततधार पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. परंतु शेतकरी सांगतात की, टिश्यू कल्चर केळी रोपे जुलैत लागवड झाली असून याच रोपांवर हा रोग आला आहे. त्यामुळे याची भरपाई संबंधित कंपनीने करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 28, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या