...नाहीतर तुमचा खून करू, तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी

...नाहीतर तुमचा खून करू, तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी

भुजंगराव मोहिते असं पत्र लिहिणाऱ्याचं नाव आहे. त्याने सुखसागर नगर पुणे असा पत्ताही पत्रात दिलाय

  • Share this:

15 सप्टेंबर : पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एक निनावी पत्र त्यांना आलंय. या प्रकरणी पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नवी मुंबईतून बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालकपदाचा कारभार स्वीकारला. नेहमीप्रमाणे इथंही त्यांनी आपल्या कामाचा धडका लावला. त्यांच्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे चांगलेच धाबे दणाणले.

पीएमपीमध्ये तुम्ही केलेली भाडेवाढ समर्थनीय नाही, तुम्ही केलेल्या भाडेवाढीमुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे लवकरात लवकर भाडेवाढ मागे घ्या, अन्यथा तुमचं आयुष्य उद्धस्त करु, तसंच तुमच्या कुटुंबाचंही बरं-वाईट करू अशी धमकी एका पत्रातून देण्यात आलीये.

भुजंगराव मोहिते असं पत्र लिहिणाऱ्याचं नाव आहे. त्याने सुखसागर नगर पुणे असा पत्ताही पत्रात दिलाय. एवढंच नाहीतर आम्ही ग़डचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या संपर्कात असून वेळ आल्यास तुमचा खूनही करू अशी उघड धमकीही  या पत्रात देण्यात आलीये.

First published: September 15, 2017, 11:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading