मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...नाहीतर राज्य अंधारात जाईल, नितीन राऊत यांचं समर्थन करत कॅबिनेट मंत्र्याने दिला इशारा

...नाहीतर राज्य अंधारात जाईल, नितीन राऊत यांचं समर्थन करत कॅबिनेट मंत्र्याने दिला इशारा

राज्यामध्ये जी संकटे निर्माण झालं ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेले नाही, आम्ही काम करतो आहे. मात्र काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावा.

राज्यामध्ये जी संकटे निर्माण झालं ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेले नाही, आम्ही काम करतो आहे. मात्र काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावा.

'वीज मंडळाची परिस्थिती बिकट आहे. शेतकरी देखील अडचणीत आहे. अशावेळी मध्यम मार्ग, सवलतीचा मार्ग काढला पाहिजे'

  • Published by:  sachin Salve

नांदेड, 17 डिसेंबर :  'वीज कोणालाही फुकट मिळणार नाही' असं वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. पण 'वीज मंडळ अडचणीत आहे. वीज मंडळाकडे पैसेच उपलब्ध झाले नाही तर राज्य अंधारात जाईल' अशी प्रतिक्रिया देत राज्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी एकप्रकारे उर्ज्या मंत्र्याचे समर्थन केलं.

नितीन राऊत यांनी वीजबिलं भरावीच लागणार असं स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या मुद्यावर अशोक चव्हाण यांनी नितीन राऊत यांची पाठराखण मध्यम मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे.

'वीज मंडळाची परिस्थिती बिकट आहे. शेतकरी देखील अडचणीत आहे. अशावेळी मध्यम मार्ग, सवलतीचा मार्ग काढला पाहिजे' असं अशोक चव्हाण म्हणाले.

लोकांना त्रास व्हावा असं आम्हाला पण वाटत नाही.  पण वीज मंडळाकडे पैसे नसेल तर राज्य अंधारात जाईल. ती दक्षता देखील घ्यावी लागते. यातून समन्वयाने मार्ग काढावा, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.

दरम्यान, आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असं वक्तव्य काल चव्हाण यांनी केले होते. त्यावर चव्हाणांनी आज सारवारव केली. 'आम्ही महत्वाचा पक्ष म्हणून आमचे समर्थन महत्वाचे आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस आशावादी आहे, मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे, तिन्ही पक्ष चांगले काम करत आहे, अशी प्रतिक्रियाही अशोक चव्हाण यांनी दिली.

नितीन राऊत यांच्या ताफ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी भिरकावली वीजबिलं

दरम्यान,  जालन्यात नितीन राऊत यांच्या ताफ्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीजबिलं फिरकावल्याची घटना घडली आहे. जालन्यातील बदनापूर शहरात ही घटना घडली. आज नितीन राऊत हे बदनापूरमध्ये नगर पंचायत निवडणुकीनिमित्त महविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी बदनापूर शहरात दाखल झाले होते.यावेळी सक्तीच्या वीज बिलाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना राऊत यांच्या ताफ्यावर वीजबिल फेकली. भाजपा युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री राऊत यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या ताफ्यावर वीजबिलं फेकण्यात आली.

First published:

Tags: नितीन राऊत