मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...नाहीतर शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्याला झोडपून काढतील, राजू शेट्टींचा गंभीर इशारा

...नाहीतर शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्याला झोडपून काढतील, राजू शेट्टींचा गंभीर इशारा

महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का?

महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का?

महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का?

बीड, 28 नोव्हेंबर : 'रब्बी हंगामात कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे (Agricultural pump) वीज कनेक्शन कपात करून सक्तीची विज बिल वसुली करणाऱ्या महावितरण (msedcl) कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का? असा रोखठोक सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetty) यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात नाव्होली इथं स्वाभिमानी संघटनेचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना राजू शेट्टी यांनी महावितरणकडून कृषीपंपावर होत असलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.

'महावितरण कंपनीने सक्तीची वीज बील वसुली चालू केल्यामुळे शेतकऱ्यांवर रब्बी हंगामात संकट आले आहे.  महावितरण कंपनीने शेतकऱ्यांवरील हा अन्याय तात्काळ  थांबवावून त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत जोडून द्यावेत अन्यथा शेतकरी पायतान घेऊन अधिकाऱ्यांना झोडपून काढतील, असा इशारा राजू शेट्टी  यांनी दिला.

अंपायरनंतर न्यूझीलंडच्या यंगचीही मोठी चूक, रहाणे म्हणाला 'हो गया हो गया'! VIDEO

तसंच, कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कपात करून सक्तीची वीज बिल वसुली करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का? असा सवालही शेट्टींनी उपस्थितीत केला.

महावितरणच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान, महावितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली  शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. पिकं सुकून जात आहेत या निराशेत तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे.  गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे ही घटना घडली. कृष्णा राजाभाऊ गायके (वय 23) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. अगोदरच अतिवृष्टीने कंबर मोडलेला शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी महाविवितरण कडू सक्तीची वीजबिल वसुली सुरू आहे.. कृष्णा गायके याने आत्महत्या केली नसून महावितरण ने केलेला खून आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

First published:

Tags: Swabhimani Shetkari Sanghatana