...नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंद, शेतकरी कोअर कमिटीचा इशारा

...नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंद, शेतकरी कोअर कमिटीचा इशारा

सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर या 5 तारखेला महाराष्ट्र बंद करणार, ६ तारखेला सर्व सरकारी कार्यालयांना टाळ ठोकणार आणि ७ तारखेला आमदार खासदारांच्या कार्यालयांना कुलूप लावणार

  • Share this:

02 जून : शेतकरी संपाने आता अधिक आक्रमक रूपधारण केलंय.  आंदोलनाचा तोडगा निघाला नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंदचा इशारा शेतकरी कोअर कमिटीने दिलाय. तसंच 6 जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आणि 7 जूनपासून आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही कमिटीने दिलाय.

आज संपाच्या दुसऱ्या दिवशी पुणतांबात ग्रामपंचायतीची बैठक पार पडली.  सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकरी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आलीये. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर या 5 तारखेला महाराष्ट्र बंद करणार, ६ तारखेला सर्व सरकारी कार्यालयांना टाळ ठोकणार आणि ७ तारखेला आमदार खासदारांच्या कार्यालयांना कुलूप लावणार एवढंच नाहीतर ७ तारखेनंतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही असा इशारा या समितीने सरकारला दिलाय.

आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता अशी माहिती कमिटीने दिली. आम्ही चर्चा करायला तयार आहोत असं कोअर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी सांगितलं.

अण्णा हजारे यांचे आभार आहे. आम्हाला त्यांच्या मध्यस्थीची गरज नाही. आंदोलनात फूट पाडण्याचा काहींचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्षाने आपल राजकारण चुलित घालावं असं कमिटीने ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 06:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading