मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Osmanabad School Bus fire : 20 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक स्कूल व्हॅनने घेतला पेट, 'ती' लोक आली देवासारखी धावून!

Osmanabad School Bus fire : 20 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक स्कूल व्हॅनने घेतला पेट, 'ती' लोक आली देवासारखी धावून!

उस्मानाबाद शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. तरुणांच्या मदतीमुळे तत्परतेने आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली (Osmanabad School Bus fire)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Osmanabad, India

उस्मानाबाद, 21 सप्टेंबर : उस्मानाबाद शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. (Osmanabad School Bus fire)दरम्यान स्थानिक तरुणांच्या मदतीमुळे तत्परतेने आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. प्राथमिक शाळेचे 20 पेक्षा जास्त विद्यार्थी या वाहनातून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे. वाहनाने पेट घेतल्याचे समजताच स्थानिक तरुणांनी तातडीने मुलांना बाहेर काढल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप बाहेर आल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी आल्याने संतप्त झालेल्या जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, स्कुल बस असलेली टेम्पो ट्रॅव्हलरने सकाळच्या दरम्यान अचानक पेट घेतला. भरवस्तीत बसने पेट घेतल्याने स्थानिकांचा काही काळ गोंधळ झाला. परंतु तरूण ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील मुलांना तातडीने बाहेर काढण्यात आले. उस्मानाबाद शहरातील सनराईज इंग्लिश स्कुल शाळेचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. उस्मानाबाद शहरातील अरब मस्जिदीसमोर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.

हे ही वाचा : संतापजनक! अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील घटना

दरम्यान विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाची आरटीओ कार्यालयात कोणतीही नोंद नसल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकारीही अचंबित झाले. अत्यंत जुन्या आणि  भंगार अवस्थेतील वाहन असल्याने पालक ही संतप्त स्थानिक तरुणांच्या जागरूकतेने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

औरंगाबादमध्येही भयानक घटना

औरंगाबादमध्ये सिडको भागात एका नशेखोर तरुणाने राडा केल्याने गोंधळ उडाला होता. नशेच्या धुंदीत नशेखोराने दोन महिला आणि दोन मुलांना दगडाने मारून जबर जखमी केले. काही काळ सिडको भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान नशेखाराला पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी मिळून तरुणाला जेरबंद केले. यावेळी संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गाडीत घालून पोलीस ठाण्यात आणत पुढील कारवाई केली.

हे ही वाचा : असे कसे मित्र? सोबत पोहोयला गेले अन् 'तो' बुडाला तर मोबाईल घेऊन पळून गेले

दरम्यान त्या व्यक्तीला व्यक्तीला वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या समोर नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. ही काल (दि.20) संध्याकाळच्या सुमारास घडली. त्याचवेळी सिडको पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेत ठाण्यात आणले. त्याच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

First published:

Tags: Crime news, Osmanabad, Osmanabad S13p40, Police