मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विवाहित प्रेयसीवर खर्च करुन तरुण कर्जबाजारी; वसुलीसाठी मित्रांसोबत कांड केलं अन् गेला आत

विवाहित प्रेयसीवर खर्च करुन तरुण कर्जबाजारी; वसुलीसाठी मित्रांसोबत कांड केलं अन् गेला आत

प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी तरुणाने चक तिच्या मुलाचेच अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार

प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी तरुणाने चक तिच्या मुलाचेच अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार

प्रेयसीवर खर्च केलेला पैसा वसूल करण्यासाठी तरुणाने चक्क तिच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Osmanabad, India

उस्मानाबाद, 4 फेब्रुवारी : उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर केलेल्या खर्चाची वसुली करण्यासाठी चक्क प्रेयसीच्या मुलाचे फिल्मी स्टाईल अपहरण केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणाचा तपास नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या 24 तासांत लावत मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांच्या सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत.

नेमका काय आहे ही घटना?

किरण लादे या तरुणाचे अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या आईसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधातून ते एकत्र राहत होते. किरण लादे हा त्याच्या प्रेयसीवर म्हणजेच अपहरण झालेल्या मुलाच्या आईवर मोठ्या प्रमाणात खर्च करत होता. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी किरण लादे आणि त्याच्या प्रेयसीचे खटके उडाले आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन ते विभक्त झाले.

वाचा - साताऱ्यातील खूनाला वेगळं वळण; पोलीस पत्नीनेच काढला पतीचा काटा; तपासात धक्कादायक खुलासा

मोबाईल लोकेशनवरुन आरोपींचा तपास

प्रेयसीवर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील ती आपल्याला सोडून गेली, असा विचार त्याच्या मनात आला. याचा राग मनात धरून आरोपीने चक्क आपल्या साथीदाराच्या मदतीने तिच्या मुलाचे अपहरण करत दोन लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. मुलगा गायब झाल्याने नळदुर्ग पोलिसाच्या हद्दीतील काटगाव या गावातील मुलाच्या आईने आणि तिच्या नातेवाईकांनी नळदुर्ग पोलिसांमध्ये तक्रार दिली. नळदुर्ग पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आपली सूत्रं हलवली. दोन पथक तयार करत मोबाईलच्या लोकेशनवरून सांगली आणि सोलापूरमध्ये तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यात अपहरण केलेल्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या आईच्या स्वाधीन केले.

कोर्टासमोर आरोपीला हजर करताच न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर गोरे हे आरोपीला पकडण्यात यशस्वी झाले आहेत.

First published:

Tags: Crime, Osmanabad