Osmanabad ZP Election Result: शिवसेनेच्या 'तानाजीं'ची बंडखोरी, भाजपला दिली साथ

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सदस्यांना बजावण्यात आला व्हीप.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सदस्यांना बजावण्यात आला व्हीप.

  • Share this:
    उस्मानाबाद, 08 जानेवारी: उस्मानाबादमध्य़े जिल्हा परिष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मतमोजणी आज होत आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत चुरस असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेची गणितं बदलली आहेत. महाआघाडीत आपल्या पुतण्याला उपाध्यक्षपद मिळत नसल्याने तानाजी सावंत यांनी भाजपसोबत घरोबा केला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकूण 55 जागा असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी 28 हा बहुमताचा आकडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 26 , शिवसेना 11, काँग्रेस 13, अपक्ष 4 असं पक्षीय बलाबल आहे. सत्तेसाठी राणा पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सदस्यांना व्हीप बजावण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. अंजली शेरखाने आणि प्रकाश अष्टे या महविकास आघडीच्या उमेदवारांना मतदान करा असं बजावण्यात आलं आहे. अन्यथा पक्षांतर्गत कारवाईला सामोरं जा अशी थेट धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सदस्य राणा पाटील यांच्या समर्थकांचा व्हिपमुळे गोंधळ उडाला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत तानाजी सावंत यांच्यामुळे भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तानाजी सावंत आपल्या सहा सदस्यांसह भाजपच्या गोटात गेल्यामुळे भाजपकडे 32 सदस्य आहेत. हेही वाचा- Nandurbar ZP Election Result: के.सी. पाडवी यांच्या पत्नीचा पराभव शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका तर पुतण्या धनंजय सावंत यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी भाजपमधून उमेदवार आहेत. आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नीचा पराभव राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी केला एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीच्या 112 गणांसाठी सहा तालुक्यात मंगळवारी मतदान झाले होते. हेही वाचा-ZP Election Result Live: नागपुरात 'गड' राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत
    Published by:Kranti Kanetkar
    First published: