शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात अशीही बनवाबनवी, यशोधर फणसेंना केलं आमदार चाबूकस्वार !

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात अशीही बनवाबनवी, यशोधर फणसेंना केलं आमदार चाबूकस्वार !

'शिवसंपर्क' अभियानादरम्यान शिवसेनेनं बनवाबनवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. आमदार गौतम चाबूकस्वार म्हणून चक्क मुंबईचे माजी नगरसेवक यशोधर फणसे यांची ओळख करुन देण्यात आली.

  • Share this:

12 मे : 'शिवसंपर्क' अभियानादरम्यान शिवसेनेनं बनवाबनवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. आमदार गौतम चाबूकस्वार म्हणून चक्क मुंबईचे माजी नगरसेवक यशोधर फणसे यांची ओळख करुन देण्यात आली.

उस्मानाबादमधील कळंब विधानसभा मतदारसंघाची शिवसंपर्क अभिनयानाची जबाबदारी सेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, चाबुकस्वार यांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या जागी मुंबई महापालिकेतले माजी स्थायी समिती सभापती यशोधर फणसे यांना तिथे पाठवण्यात आलं. मात्र, त्यांची ओळख गावकऱ्यांना करून देताना माजी आमदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी गौतम चाबुकस्वार अशी करून दिल्याने सारेच बुचकळ्यात पडले.

शिवसंपर्क अभियानाकडे पाठ फिरवणाऱ्या आमदाराच्या नावानं हजेरी लावणाऱ्या ओमराजेंच्या या कृत्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं. शिवसेनेचे पदाधिकारी शिवसंपर्क यात्रेच्या नावाखाली शेतकऱ्यांचीच खुलेआम फसवणूक करत असल्याची चर्चा यानंतर सुरू झालीय.

निंबाळकर म्हणतात, मला वाटलं...

दरम्यान, आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी आपली तोंडओळख नसल्याने तसंच त्यांना कधीही भेटलो नसल्याने आपल्याकडून अशी चूक घडल्याचं माजी सेना आमदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी केलीय. कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला उशीर झाल्यामुळे व्यासपीठावरील एखादी व्यक्ती ही चाबुकस्वार असावी असा समज झाल्यानेच ही चूक घडल्याचं त्यांनी मान्य केलंय.

प्रश्नांची सरबत्ती

या शिवसंपर्क अभियानात शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानं शिवसेना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली.  कर्जमाफी, वीज बिल माफी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव ,पीक विमा, तुरीचा प्रश्न,  दुष्काळ अशा अनेक प्रश्नाची सरबत्ती करत शेतकऱ्यांनी चांगलीच कोंडी केली.

First published: May 12, 2017, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading