• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • OSAMANABAD : जिल्हा कारागृहात Corona चा स्फोट, 131 कैद्यांना लागण, 9 महिला कैद्यांचा समावेश

OSAMANABAD : जिल्हा कारागृहात Corona चा स्फोट, 131 कैद्यांना लागण, 9 महिला कैद्यांचा समावेश

Corona Blast in Osmanabad Jail तुरुंगात एकूण 250 कैदी असून त्यांच्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानं तुरुंग प्रशासनासमोरच्या चिंतांमध्ये वाढ झाली आहे.

 • Share this:
  उस्मानाबाद, 17 मे : उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये (Osmanabad) कोरोनानं थैमान (Coronavirus) घातलं असतानाच आता कोरोनाचा संसंर्ग तुरुंगापर्यंत (Jail)पोहोचला आहे. केवळ पोहोचला नसून उस्मानाबादच्या जिल्हा कारागृहात (Osmanabad Central Jail) अक्षरशः कोरोनाचा स्फोट (Corona Blast) झाला आहे. येथील तब्बल 131 कैद्यांना (Prisoners) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानं तुरुंग प्रशासन हादरून गेलं आहे. सुदैवाची बाब म्हणजे कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. (वाचा-Pune Corona Update रुग्णसंख्या तीन आकडी, महापौर म्हणाले, धन्यवाद पुणेकर!) उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. उस्मानाबादसह, वाशी, परंडा या तालुक्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं समोर आलं. त्यात आता उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा स्फोट झाला आहे. उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील तब्बल 131 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 9 महिला कैद्यांचाही समावेश आहे. तुरुंगात एकूण 250 कैदी असून त्यांच्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानं तुरुंग प्रशासनासमोरच्या चिंतांमध्ये वाढ झाली आहे. (वाचा-'उद्धव ठाकरे म्हणजे पनवतीयों का बाप; Corona...Tauktae...सगळं वाईटचं घडतंय') उस्मानाबाद जिल्हा कारागृहात शनिवारी आणि रविवारी केलेल्या चाचण्यांत या 131 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. सर्व कैद्यांना लक्षणं नसली तरी खबरदारी म्हणून त्यांना खाजानगर येथील कैद्यांच्या विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत काळजी घेतली जात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. याठिकाणी सध्या 5687 सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती आहे. प्रामुख्यानं उस्मानाबाद शहर यासह कळंब, वाशी, परंडा हे जिल्ह्यातले कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर सुमारे 1100 हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: