उस्मानाबादमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दुसरा धक्का, नेता शिवसेनेत प्रवेश करणार

उस्मानाबादमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दुसरा धक्का, नेता शिवसेनेत प्रवेश करणार

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

  • Share this:

उस्मानाबाद, 3 सप्टेंबर : उस्मानाबाद जिल्ह्यात आघाडीला दुसरा धक्का बसणार आहे. कारण राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष असलेले प्रशांत चेडे हे गेले काही दिवस शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज प्रशांत चेडे हे मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राणा पाटलांचा भाजप प्रवेश

'निर्णय घेण्यासाठी वेळ लागला पण आता निर्णय घ्यावा लागणार आहे. केसेसला घाबरून किंवा कुठल्या चौकशीला घाबरून हा प्रवेश करत नाही,' असा खुलासा करत राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक आमदार राणा जगजीतसिंह पाटील राष्ट्रवादी सोडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आमदारांचा भाजप प्रवेश, कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीतच

राणा पाटील हे राष्ट्रवादीचे उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्षदेखील होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमाकडे जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे राणा पाटील यांच्या भाजपप्रवेशापासून राष्ट्रावादीचा मोठा वर्ग दूर राहिल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.

दरम्यान, राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुरू झाली होती. अखेर आता राणा पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे.

Video: 'राजे, भाजपमध्ये गेलाच तर माझ्या शुभेच्छा'

First published: September 3, 2019, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading