उस्मानाबाद, 9 मार्च : 6 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची शिक्षकाने छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. उस्मानाबाद शहरातील धाराशिव प्रशाला शाळेतील हा प्रकार असून शिक्षक मोहन सुरवसे याने छेडछाड केल्याचा पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे.
आरोपी शिक्षक हा मुलीला वर्गात शिकवण्याच्या बहाण्याने जवळ बोलवून अश्लील चाळे करत होता. नराधम शिक्षकाच्या या कृत्यामुळे मुलगी आज शाळेत जात नव्हती. जेव्हा घरच्यांनी तिला विचारला असता तिने हा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी याबाबत शिक्षक सुरवसेला जाब विचारत त्याची तिथंच धुलाई केली.
पीडित मुलीच्या कुटुंबाने आरोपी शिक्षकाची धुलाई केल्यानंतर त्याला उस्मानाबाद शहर पोलिसाच्या ताब्यात दिले. पोलिसांनी देखील आरोपीला ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिक्षकानेच असे किळसवाणे कृत्य केल्याने शहरात खळबळ माजली असून या शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा-हे टोळी युद्ध? भरदिवसा झालेल्या गोळीबाराने हादरलं नाशिक
दरम्यान, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. रविवारी महिलादिनीच बुलडाणा जिल्ह्यातही एक भयानक घटना समोर आली. खामगाव येथील चोवीस वर्षीय विवाहितेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.