भरधाव कंटेनरने चेकपोस्टमध्ये घुसून तिघांना चिरडलं; 2 पोलिसांचा जागीच मृत्यू

भरधाव कंटेनरने चेकपोस्टमध्ये घुसून तिघांना चिरडलं; 2 पोलिसांचा जागीच मृत्यू

सोलापूर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरने तीन पोलिसांना चिरडलं.

  • Share this:

उस्मानाबाद, 10 ऑक्टोबर: सोलापूर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. येडशी जवळ चेकपोस्टमध्ये कंटेनर घुसल्यानं दुर्घटना घडली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून होमगार्ड गंभीर जखमी आहे. तुळजापूरला जाणाऱ्या मोठ्या चारचाकी वाहनांना वळवण्यासाठी हा चेकपोस्ट उभा केला होता.

नवरात्रोत्सव संपल्यामुळे भाविक पुन्हा आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गावर वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी चेकपोस्ट उभे केले होते. रात्री 3.30 च्या सुमारास अर्धा झोपेत असलेल्या पोलिसांच्या अंगावर अचानक कंटेनर आला आणि घात झाला. चेकपोस्ट जिथे आहे त्या ठिकाणी मात्र पोलिसांनी सिग्नल, लाईट सुरू न ठेवल्यानं कंटेनर चालकाला त्याची कल्पना नव्हती. भरधाव कंटेनर थेट चेकपोस्टमध्ये घुसला आणि भीषण अपघात झाला आहे.

दरम्यान खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. भिवंडीत वाडा रोडवर दुगाड फाट्याजवळ दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या डॉक्टर असणाऱ्या तरुणीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं. मात्र बोहल्यावर चढण्याआधीच काळानं घाला घातला.

लग्नाची खरेदी झाल्यानंतर ही तरुणी ठाण्याहून भिवंडीला निघाली होती. दरम्यान त्याच वेळी दुचाकी अचानक खड्ड्यात आदळल्यानं तरुणीचा तोल गेला आणि ती खाली पडली. याच वेळी मागून येत असणाऱ्या भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

डॉ. नेहा आलमगिर शेख २३ वर्षे असे तरुणीचे नाव असून या घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या  कार्यकर्त्यांनी मध्यरात्री  अनगाव येथील  टोल नाका बंद केला आहे. वारंवार प्रशासनाला खड्ड्यांबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. अजून खड्ड्यांमुळे आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार हा प्रश्न आहे.

पुण्यात वादळी वाऱ्यासह भयंकर पाऊस, झाडं कोसळली VIDEO

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2019, 8:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading