Home /News /maharashtra /

औरंगाबादेत अवयवदानाचा 'यज्ञ'; 21 जणांना मिळालं जीवदान!

औरंगाबादेत अवयवदानाचा 'यज्ञ'; 21 जणांना मिळालं जीवदान!

वेगवेगळ्या कारणांमुळे औरंगाबादची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली असताना, याच शहरात माणूसपण जपणारा, इतरांना जीवदान देणारा अवयवदानाचा यज्ञ सुरु आहे.

    सिध्दार्थ गोदाम, औरंगाबाद, 26 ऑगस्ट : औरंगाबाद शहर सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे औरंगाबादची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली असताना, याच शहरात माणूसपण जपणारा, इतरांना जीवदान देणारा अवयवदानाचा यज्ञ सुरु आहे. अलीकडेच औरंगाबाद हे शहर अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपणाचं केंद्र बनलंय. राज्यातलं महत्त्वपुर्ण शहर असलेल्या औरंगाबादेतल्या काही घटना-घडामोडी सोडल्या तर आरोग्याच्या विभागाच्या दृष्टीकोनातून या शहराची आता एक सकारात्मक  ओळख निर्माण होतेय. कधी धार्मिक वादाची राख, तर कधी आंदोलनात भाकरी जळून खाक. कधी दहशतवादाचे ओरखडे, तर कधी दुष्काळाचे चटके. मराठावाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद अशा गोष्टींनी बदनाम झालंय. पण, याच शहरात माणूसपण जपणारा, इतरांना जीवदान देणारा अवयवदानाचा यज्ञ सुरु आहे. औरंगाबाद हे शहर आता अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या चळवळीचं केंद्र बनलंय. दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात माणुसकीचा दुष्काळ नाही हे या चळवळीच्या माध्यमातून सिद्ध होतंय. संपूर्ण मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं रुग्ण औरंगाबादची वाट धरतात. शहरातील सिग्मा, बजाज, धूत, माणिक रूग्णालय आणि शासकीय घाटी रूग्णालयात रूग्णांचे अवयव काढण्याची आणि ते अवयव गरजू रूग्णांना बसवण्याची यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे गेल्या दोन वर्षात ब्रेनडेड झालेल्या 21 रूग्णांचे अवयव दान करण्यात आले. आणि त्यातून 9 जणांना हृदय, ७ जणांना किडण्यां तर 5 जणांना करण्यात आलेल्या यकृतदानामुळे त्यांना जीवदान मिळालं असल्याची माहिती डॉ. उन्मेष टाकळकर यांनी न्यूज18 लोकमतला दिली. ह्रदयाचं प्रत्यारोपण चार तासाच्या आत करणं गरजेचं असतं. मात्र औरंगाबादेतून इतर ठिकाणी ह्रदय नेण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे इच्छा असूनही गरजूपर्यंत ह्रदय पोहचू शकत नाही. सरकारनं त्याची सोय करण्याची गरज असल्याचं मत डॉ. उल्हास कोंडपल्ले यांनी व्यक्त केलं.  VIDEO : सुप्रिया सुळेंनी बांधली भावाला राखी
    First published:

    Tags: Aurangabad, Donation, Going on, Organ, अवयवदान, औरंगाबाद, जीवदान, धूत, बजाज, माणिक रूग्णालय, यज्ञ, शासकीय घाटी रूग्णालय, सिग्मा

    पुढील बातम्या