अमित राय, प्रतिनिधी
काशीमिरा, 8 मे: राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत कठोर नियम लागू केले आहेत. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला, दूध विक्री सुरू आहे. मात्र, असे असतानाही मुंबईला लागून असलेल्या काशीमिरा (Kashimira) येथे बार (Bar) सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईला लागून असलेल्या काशीमिरा येथील मानसी बारमध्ये ऑर्केस्ट्रा बार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बारवर छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून पोलिसांनी घटनास्थळावरुन बारमधील 6 स्टाफसह 21 ग्राहकांना अटक केली आहे. तर 6 मुलींसह एका तृतीय पंथीची सुटका केली आहे. काशीमिरा पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले.
— News18Lokmat (@News18lokmat) May 8, 2021
कोरोनाच्या काळात सर्व उद्योगधंदे पूर्ण बंद आहेत अशा परिस्थितीत बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्य आणि दारू सेवन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी मानसी बारवर धाड टाकली आणि 21 जणांना अटक केली. तर बारच्या तळघरात लपून बसलेल्या 6 मुलींची आणि एका तृतीयपंथीची पोलिसांनी सुटका केली आहे.
राज्यात कोविड 19 चा प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध 15 मे पर्यंत लागू असणार आहेत. यानुसार केवळ अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरू राहणार आहेत. तर सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने सर्व खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व उत्पादने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते 11 पर्यंत सुरू ठेवम्यास परवानगी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.