वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीमध्ये सपत्नीक दाखल झाले होते. मंदिरात पूजा आटोपून राठोड यांनी प्रसार माध्यमांना गेल्या पंधरवडयानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मात्र ही प्रतिक्रिया नसून 'स्क्रिप्ट'चं वाचन आहे, सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.