'आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा', भडकलेल्या फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा', भडकलेल्या फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शासनकर्तेच असं करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असंही फडणवीस म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग असतानाच राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण झाल्याचा आरोप एका तरुणाने केला होता. या मुद्यावरून विरोधकांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. राज्याचे गृहनिर्माण खातं जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.  सुरक्षारक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आव्हाड यांच्यावरील या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून जितेंद्र आव्हाड यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,'एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे.'

सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही.  न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असंही फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या या भूमिकेवर टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

हे वाचा : कोरोना : 42 डॉक्टर्स नंतर पिंपरी-चिंचवडच्या ‘त्या’ 50 जणांचेही रिपोर्ट निगेटिव्ह

बंगल्यावर नेवून मारहाण करण्यात आली तेव्हा बंगल्यावर जितेंद्र आव्हाड सुद्धा हजर होते. तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या 15-20 जणांनी मला पोलिसांच्या फायबर काठीने तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर, मांड्यावर मारहाण केली. काठी तुटली म्हणून त्यानंतर लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली.' असा आरोप तरुणाने केला.

याशिवाय आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणाला पोस्ट का टाकली, असं विचारलं. यावेळी, त्या तरुणाने आपण अतिउत्साहात आणि भावनेच्या भरातही पोस्ट टाकली असं सांगत माफी मागितली. त्यानंतर आव्हाड यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून या तरुणाच्या घरी फोन करून त्याच्या पत्नीला ही पोस्ट काढण्यास सांगितलं अशीही माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा : दिल्लीहून आलेले 60 तबलिगी 'आउट ऑफ रेंज'; महाराष्ट्राचा धोका वाढला

संपादन - सुरज यादव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2020 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading