लॉकडाऊनचं केलं संधीत रूपांतर, उच्च शिक्षित तरुणानं अशी केली लाखोंची कमाई

लॉकडाऊनचं केलं संधीत रूपांतर, उच्च शिक्षित तरुणानं अशी केली लाखोंची कमाई

लॉकडाऊनमुळे बहुतांश व्यवसाय ठप्प झाले तर अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या.

  • Share this:

वाशिम, 1 सप्टेंबर: अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कोरोनामुळे अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानं शहरात गेलेल्या युवकाला आपल्या गावी परतावं लागलं. लॉकडाऊनमुळे बहुतांश व्यवसाय ठप्प झाले तर अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. मात्र, या लॉकडाऊनचा सदुपयोग करत वाशिम जिल्ह्यातील विजय जायभाये या कृषी शास्त्रात पदवी घेतलेल्या तरुणानं आपल्या शेतीमध्ये झेंडू फुलांची लागवड करून अवघ्या 3 महिन्यांत तब्बल दीड लाखांचं उत्पन्न मिळवून बेरोजगार युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा...शिकार केलेल्या काळविटाचं मटण खाणं पडलं महागात; काय आहे नेमकं प्रकरण?

वाशिम जिल्ह्याती भर जहाँगिर येथील विजय जायभाये हा युवक कृषी शास्त्रात पदवीधर आहे. त्यामुळं या युवकानं अधिकारी बनण्यासाठी पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. दरम्यान कोरोनाचं संक्रमण सुरू झाल्यानं राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळं विजयसमोर आपल्या गावी परतण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गावी परतल्यावर त्यानं लॉकडाऊनचा सदुपयोग घेत घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानं पारंपारिक शेतीला फाटा देत फुल शेतीला प्राधान्य दिलं. त्यानं आपल्या पाऊण एकर शेतीत अष्टगंध जातीच्या झेंडू फुलांची लागवड केली. केवळ तीन महिन्यांत या झेंडूपासून त्याला आतापर्यन्त तब्बल दीड लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. यानंतर ही त्याला किमान 75 हजार ते 1 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

काय म्हणाले विजयचे वडील?

माझा मुलगा विजय लॉकडाऊन मुळं गावी परतल्यावर त्याने 30 गुंठे शेतीमध्ये अष्टगंधा जातीची झेंडूची फुल झाडं लावली. यामधून चांगले उत्पन्न मिळाल्यानं आमच्या कुटुंबाला मोठा आधार झाला आहे. असं विजयच्या वडील गजानन जायभाये यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...लिंगायत धर्माचे धर्मगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लिंगैक्य

झेंडू फुल शेतीचे योग्य प्रकारे संगोपन केल्यामुळं चांगल्या दर्जाची फुलं लागलीत. त्यामुळं या झेंडू फुलांची थेट शेतामधूनच विक्री होत आहे. सद्यस्थितीत गणेश उत्सवासह विविध सणउत्सवाचे दिवस असल्याने मुंबई आणि पुणे च्या बाजार पेठेमध्ये ही झेंडू फुलं 200 ते 250 रूपये किलो प्रमाणे विकल्या जात आहेत. विजय जायभाये या युवकाने लॉक डाऊन च्या वेळेचे संधीत रूपांतर करून शेतीमधून चांगला पैसा कमविला असून इतर बेरोजगार युवकांनी विजय च्या पावलावर पाऊल टाकल्यास त्यांना ही चांगला पैसा कमविता येऊ शकतो.

Published by: Sandip Parolekar
First published: September 1, 2020, 8:01 PM IST

ताज्या बातम्या