Home /News /maharashtra /

महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन लोटस, पंकजा मुंडेंनी दिले संकेत

महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन लोटस, पंकजा मुंडेंनी दिले संकेत

'ऑपरेशन हे सांगून होत नसतं. लवकरच होईल आणि नंतर सर्वांना कळणार आहेच.'

बीड, 11 मार्च :  कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप घडला. काँग्रेसचे नेते  ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही अशी परिस्थिती निर्माण होईल, अशी चर्चा रंगली आहे. तर  'मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात देखील लवकरच ऑपरेशन लोटस होईल', असा गौप्यस्फोट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना त्या म्हणाल्या की, 'ऑपरेशन हे सांगून होत नसतं. लवकरच होईल आणि नंतर सर्वांना कळणार आहेच.'  तसंच,  'राज्यात मध्यप्रदेशच्या धर्तीवर आता लवकरच ऑपरेशन लोटस यशस्वी करू,'  असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं. 'भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि धनंजय मुंडे हे एका प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत. त्यांना अशा राष्ट्रीय पक्ष्याच्या भूमिका समजणे शक्य नाही आणि त्यांच्याही पक्षात असे ऑपरेशन अगोदर झालेले आहेत, त्यामुळे त्यांना चांगलेच माहीत आहे', असा खोचक टोलाही पंकजा यांनी धनंजय मुंडेंना लगावला. नुकतेच मध्यप्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी झाले असून काँग्रेसचे बडे नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू होती याला पंकजा मुंडे यानी पुष्टि दिली. 'केवळ मास्क घालून कोरोनावर उपाय होऊ शकत नाही' केवळ मास्क घालून कोरोनावर उपाय होऊ शकत नाही. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून काम करण्याची गरज आहे. सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळून काय खबरदारी घेता येईल. याकडे लक्ष दिलं पाहिजे. केवळ मास्क घालून कोरोना सारख्या व्हायरसपासून आपण सुरक्षित नाहीत आणि तो उपाय नाही, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं. 'राज्यात वेगळं काही घडणार नाही - शरद पवार तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मध्य प्रदेशसारखी राज्यात परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता फेटाळून लावली.  'मध्य प्रदेशात पडसाद महाराष्ट्रात स्थिती काही येणार नाही. महाराष्ट्र मला राजकीय स्थितीची जाण आहे. त्यामुळे मला वाटते इथं वेगळं काही घडेल असं वाटत नाही', असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ज्योतिरादित्य यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता' 'मध्य प्रदेशात सरकार हे गेले नाही. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता. कदाचित तिथ कमी काही झाले असावे', असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसंच, 'काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्त्व ही आहे आणि भविष्यही आहे', असंही पवार सांगायला विसरले नाही. भाजप प्रवेश करताना ज्योतिरादित्य शिंदे झाले भावुक दरम्यान,  ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज काँग्रेसला धक्का देत दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. 'माझं आयुष्य बदलणारं नवं वळण मी घेतलं आहे', असं सांगताना त्यांनी वडील माधवराव शिंदे यांची आठवण काढली. 'काँग्रेस पूर्वीची राहिलेली नाही. पक्ष बदलला आहे. त्यामुळे मी गेले काही दिवस व्यथित होतो. म्हणूनच मोठा निर्णय घ्यावा लागला', असं सांगताना ज्योतिरादित्य यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास दर्शवला. 'देशाचं भवितव्य पंतप्रधान मोदींच्या हाती सुरक्षित आहे', असंही ते म्हणाले. "आयुष्यात अशी काही वळणं येतात, ज्याने आयुष्य बदलून जातं. तसे माझ्या आयुष्या 2 दिवस महत्त्वाचे ठरले. पहिला दिवस 30 सप्टेंबर 2001 - ज्या दिवशी मी माझ्या पूजनीय वडिलांना गमावलं. या दिवसाने माझं आयुष्य बदललं. त्याबरोबर दुसरी तारीख 10 मार्च 2020. त्यांच्या 75 व्या जयंतीचा दिवस. जीवनात नवं वळण या दिवशी घेण्याचा निर्णय मी घेतला", असं ज्योतिरादित्य म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Dhanjay munde, MP, Pankaja munde

पुढील बातम्या