मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ऑपरेशन बांगलादेशी! पुण्यात मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी टाकली धाड

ऑपरेशन बांगलादेशी! पुण्यात मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी टाकली धाड

मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यात धाड टाकत संशयितांना पोलिसांच्या ताब्य़ात दिलं आहे

मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यात धाड टाकत संशयितांना पोलिसांच्या ताब्य़ात दिलं आहे

मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यात धाड टाकत संशयितांना पोलिसांच्या ताब्य़ात दिलं आहे

पुणे, 22 फेब्रुवारी : पुण्याच्या धनकवडीतील बालाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांग्लादेशी घुसखोरांचा शोध सुरू केला आहे. आज सकाळी मनसेचे तब्बल 50 कार्यकर्ते पुण्यातील बालाजीनगर परिसरात नागरिकांचे ओळखपत्र तपासत होते. त्यातील तीन संशयित बांगलादेशी घुसरखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे. ही कुटुंब धनकवडीतील बालाजीनगरमध्ये राहतात. त्यांनी आम्ही बांगलादेशी नसून पश्चिम बंगालचे असल्याचा दावा केला आहे. तशी ओखळपत्रंही त्या कुटुंबाकडून  दाखविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने ठाणे, बोरिवली या भागातील बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहीम केली होती. यावेळी ठाण्यातील किंगकॉंगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यावेळी त्या कुटुंबाकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी गोष्टी मिळाल्या. मात्र त्यांच्याकडे बांगलादेशाचा पासपोर्टही आढळून आल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली होती.

बांगलादेशी की बिहारी ?

धनकवडी येथील बालाजीनगरमध्ये सुरू असलेल्या तपासात काही संशयित बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही कागदपत्रांची विचारणा केली असताना त्यातील काहींना बांगलादेशी नसून बिहारी असल्याचे सांगितले. त्यामुळे येथे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मात्र याबाबतची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकूण आठ कुटुंबांच्या ओळखपत्रांची  तपासणी केली होती. पण कुणकुण लागल्याने पाच संशयितांच्या घरांना कुलूप आढळून आलं. ही कुटुंब बालाजीनगरमधील गुलमोहोर अपार्टमेंटमध्ये राहत होती.

संयुक्तपणे केली होती कारवाई

अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरातून सापळ रचून बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात आली होती. अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अर्नाळा पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. यामध्ये १० महिला एक अल्पवयीन मुलगा आणि १२ पुरुषांचा समावेश होता. हे सर्व बांगलादेशी बेकायदेशीरपणे येथे राहत होते.

First published:
top videos

    Tags: Bangladeshi infiltrators, Chief raj thackeray, MNS