निवृत्तीला अवघे 3 दिवस असताना कोरोना योद्ध्याने घेतला जगाचा निरोप

कोरोनाशी लढा देत असताना अनेक कोरोना योद्ध्यांना स्वत:चा जीव गमवावा लागला. त्यांचे कार्य महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.

कोरोनाशी लढा देत असताना अनेक कोरोना योद्ध्यांना स्वत:चा जीव गमवावा लागला. त्यांचे कार्य महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.

  • Share this:
मुंबई, 28 मे : निवृत्तीला अवघे 3 दिवस उरले असताना अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव अग्निशमन दलात कार्यरत असणारे रफिक शेख यांना कोरोना झाला होता.  त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशात त्यांचा मृत्यू झाला. 31 मे रोजी  त्यांच्या अग्निशमन सेवेतील शेवटचा दिवस होता. 31 मे रोजी अगदी मोठ्या आनंदाने त्यांनी त्यांच्या मुंबई अग्निशमन दलातील प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांचं कौतुक करत किंवा त्यांचं निवृत्तीचा सोहळा अगदी छान पार पडला असता. पण ते सगळं याची देही याची डोळा पाहण्याआधीच रफिक शेख यांनी  मृत्यूला कवटाळले. रफिक शेख हे गोरेगाव अग्निशमन दलामध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते.  काही दिवसांपूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. रफीक यांच्या निवृत्तीला 3 दिवस असताना प्राणज्योत मालवली. दुसऱ्या बाजूला कोविडशी लढा देऊन बरे झालेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्याने निवृत्तीला 3 दिवस असताना कामावर परतण्याचा निर्णय घेतला. कोरोना बाधित असलेल्या आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या बेस्टच्या एका कर्मचाऱ्याने निवृत्तीला अवघे तीन दिवस असताना आज पुन्हा कामावर येण्याचा निर्णय घेतला. मरोळ डेपोमध्ये काम करणारे रामचंद्र शिंदे यांना 8 मे रोजी साधा खोकला सुरू झाला, पण नंतर त्यांच्या काही चाचण्या झाल्या आणि त्याच्या लक्षात आलं की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, व तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 22 मे रोजी  बरे होऊन रामचंद्र शिंदे घरी परतले. शिंदेही रफिक शेखप्रमाणे 31 मे रोजी रिटायर होत आहेत. आणि त्यांच्या निवृत्तीला पण तीन दिवस आहेत.  त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना घरीच आराम करा सांगितलं. पण शिंदे बेस्टमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करतात आणि त्यांनी आपला रिटायरमेंट निवृत्तीचे शेवटचे दिवस काम करताना घालवायचा आहे, असा हट्ट केला आणि आज पुन्हा ते मरोळ डेपोमध्ये रुजू झाले. जिथे अनेक ड्रायव्हर कंडक्टर आणि इन्स्पेक्टर यांनी कोरोनाच्या भीतीपायी कामावर येण बंद केले आहे. बेस्टने अनेकांना कामावर रुजू होण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. ज्यात अनेक तरुण कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पण रामचंद्र शिंदे हे एक सगळ्यांना मोठे उदाहरण आहेत की स्वतः पॉझिटिव असताना आणि निवृत्तीसाठी इतके कमी दिवस असतानाही त्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचा विचार केला, नव्हे ते परत आले. रामचंद्र शिंदे हे मूळचे सातारचे आहेत. त्यांना दोन्ही मुली आहे. मुंबईत खाजगी कंपनीत नोकरीला आहेत आणि निवृत्तीनंतर रामचंद्र शिंदेही खाजगी कंपनीत रुजू होणार आहेत. शिंदेच्या म्हणण्यानुसार 'मी बेस्टमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. तेव्हापासूनच बेस्ट बंद होईल बंद होईल असं म्हटलं गेल पण बेस्ट बंद होणार नाही आणि मुंबईकरांची अविरतपणे तशी सेवा करत राहील.' कोरोनाबाधित होण्याची भीती असतानाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम करतात. अग्निशमन दलाचे असू दे किंवा मग बेस्ट असू दे किंवा पालिका प्रशासनाचे. यात अनेकजण आपल्या सहकाऱ्यांना गमावत आहेत. आपल्या अनेक सहकाऱ्यांना कोरोना होताना बघत आहेत. पण तरीही अविरतपणे न घाबरता सेवा सुरू ठेवणाऱ्या सेवा या सगळ्या कोरोना योध्यांना एक कडक सॅल्यूट.  
First published: