घर घेण आता सोपं! आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क

घर घेण आता सोपं! आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क

तुम्ही जर सरकारनं निर्देशीत केलेल्यी नियमांच्या चौकटीत बसत असाल, तर पहिलं घर विकत घेताना तुम्हाला मुंद्रांक शुल्क म्हणून फक्त 1 हजार रूपये भरावे लागणार आहेत.

  • Share this:

24 एप्रिल : छोटसं का होईना, पण डोक्यावर स्वतःचं आणि हक्काचं छप्पर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि हे स्वप्न साकारण्यासाठी सरकारनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर सरकारनं निर्देशीत केलेल्या नियमांच्या चौकटीत बसत असाल, तर पहिलं घर विकत घेताना तुम्हाला मुंद्रांक शुल्क म्हणून फक्त 1 हजार रूपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे आता कमी पैसे देऊन आपल्या स्वप्नातलं घर घेता घेणार आहे. सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सर्वसामान्यांमधून आनंद व्यक्त केला जातो.

सध्या घराच्या रकमेवर 5 टक्के मुद्रांक शुल्क भरावं लागतं, आणि ही रक्कम अर्थात काही लाखांच्या घरात असते. मात्र आता फक्त एक हजार रूपये भरावे लागणार आहेत. पण हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटींचं पालन करावं लागणार आहे.

या सवलतीसाठी सरकारच्या काही अटीसुद्धा असणार आहे. नेमक्या काय अटी असणार यावर एक नजर टाकूयात...

- पहिल्या घरासाठी फक्त रू.1 हजार मुद्रांक शुल्क

- वार्षिक 6 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना लाभ

- मुंद्राक शुल्कात सवलत

- तुमच्या मालकिचं पहिलंच घर असावं

- तुमचं उत्पन्न ६ लाखांपर्यंतच असाव

- ३० ते ६० चौरस मिटरच्या घरांनाचं लाभ

- गृहप्रकल्प नोंदणिकृत असावा

First published: April 24, 2018, 7:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading