Home /News /maharashtra /

Tauktae Cyclone: मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही, रत्नागिरी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

Tauktae Cyclone: मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही, रत्नागिरी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

फाईल फोटो

फाईल फोटो

CM Visit Rantnagiri: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांनी वादळाचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांची पाहाणी केल्यानंतर त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे.

    रत्नागिरी, 21 मे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांनी वादळाचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. रत्नागिरीत तौत्के चक्रीवादळानं नेमकं किती नुकसान झालं आहे, याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या. संपूर्ण आढावा घेऊन पीडितांना योग्य ती मदत केली जाईल. यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे केले. जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आदी नेते याठिकाणी उपस्थित होते. तौत्के चक्रीवादळानं जिल्ह्यातील 5 तालुक्यांना जबरदस्त फटका दिला आहे. यात सर्वाधिक नुकसान  राजापूर आणि रत्नागिरी तालुक्याचं झालं आहे. जिल्ह्यात चक्रीवादळानं आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीनं पंचनामे करून नेमकी आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी त्यांनी कोविडचा आढावा देखील घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल, अशी चर्चा सध्या देशात सुरू आहे. पण आपण योग्य ती खबरदारी आणि उपाय योजना केल्यानंतर तिसरी लाट येणारच नाही. येत्या काळात यासाठी प्रयत्न करु असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे ही वाचा-VIDEO: कोरोना परिस्थितीविषयी डॉक्टरांशी संवाद साधताना PM नरेंद्र मोदी झाले भावुक त्याचबरोबर, जिल्ह्यांत झालेल्या नुकसानीबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तपशीलवार माहिती दिली. चक्रीवादळात रत्नागिरी जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 8 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर एकूण 11 जनावरं दगावल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तौत्के चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 17 घरं पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित झालेल्या घरांची संख्या तब्बल 6766 एवढी आहे. याशिवाय चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील 1042 झाडं पडली आहेत. हे ही वाचा-चक्रीवादळानंतर मुंबईच्या किनारपट्टीसमोर नवी समस्या, महापालिका कसा करतेय सामना? चक्रीवादळात 59 दुकानं आणि टपऱ्यांचं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यातील आहेत. चक्रीवादळानं फळबागांचं प्रचंड नुकसान केलं  आहे. अंदाजे 1100 शेतकऱ्यांचं साधारणतः 2500 हेक्टर इतकं नुकसान झालं आहे. यातील 3430 शेतकऱ्यांच्या  810.30 हेक्टरवरील शेतीच्या पंचनाम्यांचं काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे. हे ही वाचा-...अन् जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांपुढे केलं CM उद्धव ठाकरेंचं कौतुक, वाचा कारण दुसरीकडे चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. या वादळामुळे 1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे.त्याचबरोबर, जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर  परतलेल्या  बोटींपैकी 3 बोटींचं पूर्णत: तर 65 बोटींचं अशंत: नुकसान झालं आहे. याचा अंदाजित नुकसान खर्च 90 लाख रुपयांपर्यंत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका कोविड सेंटरचं ई-उद्घाटन देखील केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Ratnagiri, Uddhav thackeray

    पुढील बातम्या