दिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट

दिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट

आज औरंगाबादमध्ये फोरटी फाईट मिठाच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद, 15 आॅक्टोबर : येत्या दिवाळीत भाजप-शिवसेना सरकार गोरगरिबांना बहुतेक डाएट लाडू खाऊ घालणार असंच दिसतंय. कारण दिवाळीनिमित्त बीपीएल रेशनकार्ड धारकांना फक्त 1 किलो साखर आणि 2 किलो हरभरा डाळ मिळणार आहे. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीच याबद्दल घोषणा केलीये.

दिवाळी निमित्त कार्डधारकांना प्रति कुटुंब एक किलो साखर दिली जाणार आहे. ही साखर वाटप फक्त दिवाळीत दिली जाणार असल्याचं गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. साखरेसोबत २ किलो हरभरा डाळही दिली जाणार असल्याचं बापट यांनी सांगितलं. राज्यात स्वस्त दुकानातून साखर वाटप बंद होते. आता दिवाळीनिमित्ताने 1 किलो साखर आणि 2 किलो हरभरा डाळ मिळणार आहे.

आज औरंगाबादमध्ये फोरटी फाईट मिठाच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. अन्न पुरवठा खात्याचे मंत्री गिरीश बापट आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते फोरटी फाईट मिठाच्या वाटपाचा शुभारंभ झाला.

आयोडीन युक्त हे मीठ स्वस्त धान्याच्याच दुकानात मिळणार आहे. दारिद्रय रेषेखाली पिवळे रेशन कार्ड नसले तरी प्रत्येकाला हे मीठ 14 रुपये किलो प्रमाणे मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त भागासाठी असलेली अन्न सुरक्षा योजना अधिक सक्षमपणे राबवली जाणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील एकही व्यक्ती अन्नाशिवाय उपाशी राहणार नाही असा विश्वासही गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

========================================================================

First published: October 15, 2018, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading