डिजिटल इंडियाचा फज्जा? ई-फेरफार, सातबारासाठी शेतकऱ्यांसह तलाठ्यांची डोकेदुखी

डिजिटल इंडियाचा फज्जा? ई-फेरफार, सातबारासाठी शेतकऱ्यांसह तलाठ्यांची डोकेदुखी

ई-फेरफार, महाभूमी वेबसाइडच्या प्रॉब्लेममुळे डिजिटल इंडियाचा अक्षरशः भ्रमाचा भोपळा फुटला आहे. साईट चालत नसल्यामुळे तलाठयांना रात्र रात्र जागून प्रिंट काढाव्या लागत आहेत.

  • Share this:

बीड, 18 जुलै- ई-फेरफार, महाभूमी वेबसाइडच्या प्रॉब्लेममुळे डिजिटल इंडियाचा अक्षरशः भ्रमाचा भोपळा फुटला आहे. साईट चालत नसल्यामुळे तलाठयांना रात्र रात्र जागून प्रिंट काढाव्या लागत आहेत. यातच सातबारासाठी तलाठी कार्यालयात सतरा चकरा मारूनही मिळत नसल्याने ऐन सीझनमध्ये शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरु आहे. या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी पण केल्या आहेत.

बीड तालुक्यातील चिंचोली माळी, घोडका राजुरी सज्जाच्या समोर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तशीच गर्दी शिदोड सज्जामध्ये पाहायला मिळाली. या ठिकाणी चार चार चकरा मारूनही सातबारा मिळत नाही, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केली.

बीड जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेची अंतिम तारीख जवळ आल्याने शेतकरी तलाठी सज्जा उघडण्या आगोदर गर्दी करत आहेत. मात्र ई फेरफार, महाभूमी वेबसाइटच्या प्रॉब्लेममुळे शेतकऱ्यांना वेळेवर कागदपत्रे देता येत नाहीत. म्हणून तलाठ्यांची पूर्ती गोची झाली आहे. यातच अतिरिक्त तलाठी सज्जाचा भार, रिक्त जागा यामुळे या अडचणीत दुप्पट वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे तलाठी संघटना सांगत आहे. महाराष्ट्रात तलाठी पदाच्या रिक्त जागाची संख्या 2106 च्या घरात आहे तर बीड जिल्ह्यात 70 जागा रिक्त आहेत. या सर्व सज्जाचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाठी कार्यालयातील कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत असल्याचे तलाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर राख यांनी सांगितले.

घोडका राजुरीचे तलाठी किशोर तांबारे यांनी सांगितले की, ई फेरफार साइड वारंवार बंद असते. या बाबतीत वरिष्ठ अधिकारी यांना वारंवार माहिती देऊन ही दुरुती होत नाही, म्हणून रात्री बेरात्री आम्ही साइड चालू होते. तेव्हा प्रिंट काढतो. माझ्याकडे पाच गावे आहेत. त्यांचा अतिरिक्त ताण आहे. मात्र आम्ही लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे तांबारे यांनी सांगितले. अशीच व्यथा शिदोड सज्जाचे तलाठी शरद घोडके यांचीही आहे.

बीड जिल्ह्यातील 50 तलाठी सज्जाला भेट देवून पाहणी केली असता, पिक विमा, पिक कर्ज, या साठी आज सातबारा आणि इतर कागदपत्र लागतात. शासनाने ई-फेरफार करुन डिजिटल सातबारा दिल्या जातील, अस सांगितलं. या साठी एक वर्षाचा कालावधी घेतला. मात्र, या साइडचा गोंधळ सुरु आहे. यामुळे अक्षरशः डिजिटला हरताळ फसण्याचे काम झाले आहे. यातच तलाठय़ांच्या रिक्त पदामुळे कामकाज ढेपाळले आहे. रिक्त पदे लवकर भरा, अशी मागणी होत आहे. यातच संतप्त शेतकरी तलाठय़ाच्या अंगावर धावून येत. यामुळे सातबाराचे भांडणे हातापायांवर येतात. हा प्रकार सुरु आहे. या बाबतीत पुणे येथील ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्याशी फोनवरून विचारनां केली असता अभिलेख महाभूमी या साइड वरून रोज दोन लाख ई-सातबारा देतो, पिक विम्यामुळे दिवसाला 6 लाख सातबारा आम्ही दिल्या आहेत. मात्र जास्त ताण आल्याने कदाचीत थोडा वेळ लागू शकतो. डेटा सर्व्हर ESDS या मुंबईतील खासगी कंपनीकडे आहे, असे त्यांनी सांगितलं. मात्र टेक्निकल प्रॉब्लेममुळे महाभूमी साइड सध्यातरी डोकेदुखी ठरते आहे.

VIDEO : प्रेयसीच्या घरी रंगेहात सापडला पती, मग काय पत्नीने धु-धु धुतले

First published: July 18, 2019, 8:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading