मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सिद्धिविनायकाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! ट्रस्टने घेतला 'हा' निर्णय

सिद्धिविनायकाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! ट्रस्टने घेतला 'हा' निर्णय

कोरोनाकाळात काळजी घेण्यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन बुकिंग सक्तिची केली होती.

कोरोनाकाळात काळजी घेण्यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन बुकिंग सक्तिची केली होती.

कोरोनाकाळात काळजी घेण्यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन बुकिंग सक्तिची केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 सप्टेंबर : मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर श्रीगणेशाचे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. जगभरातील अनेक भाविक याठिकाणी येऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतात. हे सध्या भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सिद्धिविनायक ट्रस्टने भाविकांसाठी एक आनंदाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाकाळात काळजी घेण्यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन बुकिंग सक्तिची केली होती. बुकिंग झाल्यावरच भाविकांना श्रीगणेशाचे दर्शन घेता येईल, असा निर्णय घेतला होता. तसेच यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. कोणीही गर्दी करू नये, असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले होते. तर ज्येष्ठ नागरिकांनी लाइव्ह दर्शन घ्यावे. परिस्थिती नियंत्रणात आली की मग ज्येष्ठ नागरिकांनी यावे, असे आवाहन मंदिर समितीने कोरोनाकाळात केले होते. मात्र, आता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने सरकारने निर्बंध हटविली आहेत.

त्यामळे आता सिद्धिविनायक मंदिर समितीने भाविकांसाठी दर्शनासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंग आवश्यक नाही, असा निर्णय घेतला आहे. श्री सिद्धिविनायकाचे दर्शन आता कोरोना महारामारीच्या आधी जसे होते, तसेच सुरू करण्यात आले आहे, असे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीने म्हटले आहे.

सेलेब्रिटींचा बाप्पा -

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मुंबईतील प्रसिद्ध गणपतीचं दर्शन घेतात. मग त्यांचा नवीन एखादा चित्रपट असो किंवा वाढदिवसाचं कारण असो. हे कलाकार सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पापुढे डोकं टेकवून आशीर्वाद घेतात. हे कलाकार भक्तिभावाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दिसतात. काही कलाकारांनी तर अनवाणी चालत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. कोणकोणत्या कलाकारांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे.

सिद्धीविनायक अ‌ॅप (Siddhivinayak App) -

श्री सिद्धिविनायक मंदिर अॅप हे iOS आणि Android नेटिव्ह मोबाइल अॅप्लिकेशन आहे. भक्तांना यामुळे थेट दर्शन, भेटीची वेळ/दर्शन बुक करण्यास, व्हिडिओ कॉलद्वारे पूजा करण्यास, त्यांचे बुकिंग पाहण्यास, पेमेंट गेटवे, पैसे दान करण्यास आणि त्यांच्या देणग्या पाहण्यासाठी उपयुक्त आहे. हे अॅप इंग्रजी, मराठी आणि हिंदी या 3 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

First published:

Tags: Mumbai, Siddhivinayak Mandir