आता कांदा हसवणार! आवक वाढल्याने दरात मोठी घसरणं, जाणून घ्या आजचा दर

आता कांदा हसवणार! आवक वाढल्याने दरात मोठी घसरणं, जाणून घ्या आजचा दर

अफगाणिस्तानातून आयात केलेल्या कांद्यामुळे दरवाढीला बसला लगाम.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर: महागाईनं कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांचे कांद्यानं गेल्या काही दिवसांपासून चांगलेच वादे केले होते. मात्र वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे त्रासलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. सरकारने कांदा आयात करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे कांद्याचे दर घसले आहेत. बुधवारी 120 रुपयांवरून कांदा 65 रुपये किलोवर आला होता मात्र अजून कांद्याचे दर घसण्याची चिन्हं आहेत. 15 डिसेंबरनंतर अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेला कांदा बाजारात आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. कांद्याच्या सुरू असलेल्या दरवाढीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला होता. अवकाळी पावसामुळे कांद्याचं झालेलं मोठं नुकसान लक्षात घेता बाजारात कांद्याचा पुरवठा कमी झाला होता. कांद्याला मागणी जास्त मात्र पुरवठा कमी असल्यानं त्याचे दर वाढले होते. मागच्या आठवड्यात कांदा 150 रुपये किलो होता.

वाचा-एका पेक्षा जास्त बँकेत खाती असतील तर सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान

कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लासलगाव आणि मनमाडमधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. कांदा आयात करण्यात येऊ नये या मुख्य मागणी सह कांद्या बाबत केंद्र शासनाच्या धोरणा विरुद्ध शेतकरी उतरले रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीच्या गेट समोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.

अफगाणिस्तानमधून येणारा कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे दर थेट 65 रुपयांवरून 45 पर्यंत गडगडण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गामध्ये या निर्णयाचा मोठा विरोध होताना पाहयला मिळत असला तरीही सर्व सामान्यांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात जवळपास सर्वात जास्त स्वयंपाक घरात वापरला जाणारा कांदा असल्यामुळे हॉटेल्स, ठेल्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.

वाचा-आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला दोन मोठे धक्के, उत्पादन दर पुन्हा घसरला

कांद्याचे दर महिनाभरापासून गगनाला भिडले आहेत.त्यामुळे सामान्यांच्या घरातून कांदा हद्दपार झाला आहे. हॉटेल, खानावळीतूनही कांद्याचा वापर कमी झाला होता. याचा परिणाम ग्राहकांसह छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. गुजरात, राजस्थान आणि तुर्कस्तानमधूनही कांद्याची आवक करण्यात आली आहे. कांद्याला मिळणारा वाढता दर आणि ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होण्याची भीती असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणला. त्यामुळे आता आवक वाढत असल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली. वाढत्या दरामुळे ग्राहकांनी कांद्याकडे पाठ फिरवली. त्याचा परिणाम म्हणून आता दर उतरत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 13, 2019, 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading