अबब...भाव वाढताच चोरांनी मारला 27 क्विंंटल काद्यांवर डल्ला!

अबब...भाव वाढताच चोरांनी मारला 27 क्विंंटल काद्यांवर डल्ला!

कांदा चोरीच्या या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून कांदा चाळीवर राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

  • Share this:

बब्बू शेख, मनमाड 24 सप्टेंबर : भावात मोठी वाढ होताच कांदा चोरीच्या घटना  सुरू झाल्या आहेत. मालेगावच्या कौळाने आणि कळवणच्या मोकभगणी येथे चोरट्यांनी चाळीतील साठवून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारून 27 क्विंटल कांदा चोरून नेला. बाजार समितीत कांदा घेऊन जाण्यासाठी सकाळी शेतकरी चाळीवर आले असता त्यांना कांदा चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुष्काळावर मात करून कष्टाने पिकविलेला कांदा चोरी झाल्याचे पाहून दोन्ही शेतकरी हवालदिल झाले.  शेतकऱ्यांनी कांदा चोरीची तक्रार दिल्यानंतर  पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका आरोपीला ताब्यात घेतलं. कांदा चोरीच्या या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये  चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून कांदा चाळीवर राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

'वंचित'ची एवढ्या जागांसाठी पहिली यादी जाहीर, उमेदवारांची जाहीर केली जात!

कांदा गाठणार शंभरी

नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.कांदा दरात चक्क एका रात्रीत साडेबाराशे रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मोठी मागणी वाढल्यानं शेतकरी आनंदात आहे. केंद्रीय समितीनं पाहणी करून दर अधिक वाढतील असा अहवाल सादर केलाय.पावसामुळे कर्नाटक, मध्यप्रदेश आणी आंध्रप्रदेशात कांदा पिकाला मोठा फटका बसला होता. आता मात्र कांद्याच्या भावात तेजी राहील, असा केंद्रीय समितीचा निष्कर्ष आहे.

ग्राहकांना मात्र याचा फटका बसणार आहे. घाऊक बाजारात कांद्याचे भाव 60 ते 70 रुपये किलोपर्यंत गेलेत. कांदा सफरचंदापेक्षाही महाग झालाय. सिमल्यामध्ये सफरचंदाच्या किंमती 30 रुपये किलोपासून सुरू होतात. कांदा मात्र 60 रुपये किलोने घ्यावा लागतोय.मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात जोरदार पाऊस पडल्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आणि त्यामुळेच दरांमध्ये ही वाढ झाली.

शरद पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू, म्हणाले...

दिवाळीनंतर पीक हातात येणार

नाशिकमध्ये चांगल्या दर्जाच्या कांद्याचं उत्पादन होतं पण पावसामुळे हे पीक हातात यायलाही उशीर आहे. याआधी दिवाळीच्या आधी कांद्याची साठवण व्हायची पण आता दिवाळीनंतर होणार आहे. म्हणजेच कांद्याचं पीक यायला एक महिना उशीर आहे. पाकिस्तान, इजिप्त या देशातून भारतात कांदा आणला जाणार आहे. हा कांदा 15 ऑक्टोबरपर्यंत येईल. त्यानंतर मात्र कांद्याचे भाव खाली येऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

लोकसभेत तोंडावर आपटलात, आता झाकली मुठ ठेवा; तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

कांद्याचे भाव नियंत्रित राहावेत यासाठी कांद्याच्या साठवणुकीलाही आळा घालावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. कांद्याच्या साठवणुकीमुळे दरात वाढ होतेय. घाऊक बाजारात कांदे 15 ते 20 रुपये किलोने विकले जायचे. आता हे दर 48 रुपयांवर गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या