नाशिक 22 ऑक्टोबर: रोजच्या जेवणात आवश्यक असणाऱ्या कांद्याने किरकोळ बाजारात गुरुवारी शंभरी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी एक किलो कांद्याचा भाव(Onion price) हा 100 ते 120 च्या दरम्यान होता. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या नवरात्र सुरू आहे. त्यातच हॉटेल्सही सुरू झाली आहेत. त्यामुळे मागणी वाढली आहे. तर पावसामुळे नवा कांदा वाया गेला. कांद्याच्या उत्पादनात घट लक्षणीय घट झाल्याने भाव वाढल्याचं सांगितलं जात आहे.
भाव आटोक्यात राहावेत यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदीही केली होती. तर कांदा आयातीलाही परवानगी दिली होती. त्यामुळे परदेशातील कांदा देशात दाखल होत आहे. इजिप्त, इराण, इराक आणि तुर्कस्तानचा कांदा मुंबई आणि चेन्नई बंदरात दाखल झाला आहे.
सध्या गावठी कांदा बाजारात दाखल झाला आहे. रांगडा म्हणजेच लाल कांदा, पोळ कांदा यायला अजून लागणार 2 महिने लागणार असून तोपर्यंत भावात तेजीच राहणार असल्याचं बोललं जात आहे.
अजितदादांच्या प्रकृतीबद्दल पार्थ पवारांनी दिली माहिती,'त्या' वृत्ताचे केले खंडन
गेली काही दिवस मुसळधार पाऊस पडल्याने कांद्याचं मोठं नुकसान झालं होतं. अनेक टन कांदा सडून गेला. नाशवंत माल असल्याने तो जास्त काळ तसाच ठेवता येत नाही. भाव वाढले तरी प्रत्यक्ष त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो याबद्दल शंका घेतली जात आहे. व्यापारी आणि मधले दलाल हेच जास्त पैसा कमवत असल्याचीही बोललं जातं.
कांदा व्यापाऱ्यांवर धाडी
आयकर विभागाने (Income Tax) लासलगाव परिसरातल्या 9 कांदा व्यापाऱ्यावर 14 ऑक्टोबर बुधवारी छापे घातले होते. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या विविध पथकांनी एकाच वेळी ही कारवाई सुरू केली होती. व्यापाऱ्यांची कार्यालये, गोडावून, कागदपत्र यांची कसून तपासणी केली जात आहे. निर्यात बंदी करून देखील कांद्याचे भाव आटोक्यात येत नसल्याने केंद्र सरकारने ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
'आयातीवर अधिकचा कर नको' रघुराम राजन यांचा 'आत्मनिर्भर भारत'वरून इशारा
या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 1998 पासून आजपर्यंत 22 वर्षात 17 वेळा कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. बडे व्यापारी कांद्यांचा साठा करून भावांमध्ये चढउतार निर्माण करतात असा आरोप केला जातो. त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही तर फक्त दलालांची चांदी होते असाही आरोप केला जात आहे.
कांदयाचे भाव वाढत असल्याने सरकारने काही आठवड्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरुद्ध टीकाही झाली होती. आता सण आणि उत्सवांचे दिवस सुरू झाल्याने कांद्यांची मागणी वाढत असते. त्या काळात महागाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं.