कांद्याने केले सर्वसामान्यांचे वांदे, व्यापाऱ्यांना मात्र अच्छे दिन

कांद्याने केले सर्वसामान्यांचे वांदे, व्यापाऱ्यांना मात्र अच्छे दिन

लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला हजार रुपये दर, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री.

  • Share this:

बब्बू शेख (प्रतिनिधी) लासलगाव, 21 नोव्हेंबर: दोन दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्यांच्या दरानं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. कांद्याचा दर प्रति क्विंटल 7 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर लाल कांद्याला 5 हजार 850 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. या मोसमात कांद्याच्या दरवाढीचा हा उच्चांक असल्याचं मानलं जात आहे. लासलगाव सोबत नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यात ही कांद्याला मिळत आहे चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. अवकाळी पाऊस, पावसानंतर आलेली रोगराई किटक यांमुळे अनेक ठिकाणी कांद्याचं मोठं नुकसान झालं. काही शेतकऱ्यांनी तर 15 गुंठे जमिनीवर लावलेल्या कांद्यावर थेट ट्रॅक्टर फिरवला. सरकारकडून तुटपुंजी मदत होत असल्यानं शेतकरी त्रस्त होता. त्यामुळे कांद्याची यंदा आवक कमी झाली. कांद्याला मागणी जास्त तर मात्र पुरवठा कमी असल्यानं कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळलं.

कांद्याचे भडकलेले दर लक्षात घेऊन दर नियंत्रणात आणण्यासाठी 1.2  लाख टन कांदा आयात करण्यासाठी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचे दर नियंत्रणात येतील असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केला आहे. वाढती महागाई, आर्थिक मंदी, अवकाळी पाऊस आणि पिकावरील समस्या या सगळ्याचा विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. त्यामुळे कांद्याची आयात करून कांद्याचे अतोनात वाढलेले दर नियंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 21, 2019, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading