कांद्याचे भाव घसरले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

कांद्याचे भाव घसरले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

कांद्याचे भाव कमी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे तर शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे.

  • Share this:

नाशिक,  04 नोव्हेंबर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी (Farmers) हवालदील झाले आहे. कांद्याचे भाव (Onion Price) वाढल्यामुळे दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता भर पडली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे दर घसरत असल्यानं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यात आठशे ते हजार रुपयांनी कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  केंद्र सरकारने कांदा आयात केल्यामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचा आरोप केला जात आहे.

आधी केली फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलवून महिलेनं हातोड्यानं फोडलं तरुणाचं डोकं

काही दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवल्यानं मोठा फटका कांदा उत्पादकांना बसला होता. त्यानंतर लिलाव सुरू झाले आणि कांद्याला दरही चांगला मिळाल्यानं शेतकरी सुखावला होता.

मात्र,आता पुन्हा एकदा कांद्याचे दर घसरू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सरासरी कांद्याला साडेतीन ते साडेचार हजार रुपये क्विंटल मागे सध्या दर मिळत आहे. आणखी भाव घसरला तर कांद्याला कमी भाव मिळणार आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे.

डाळींच्या किंमती घसरल्या, 20 टक्क्यांपर्यंत झाल्या स्वस्त

लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांत  सरासरी भावात प्रति क्विंटल तब्बल 1 हजार 900 रुपयांची तर जास्तीत जास्त भावात 1 हजार 480 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांद्याचा भाव 34 रुपये किलोवर येऊन पोहोचला आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण होत आहे. कांद्याचे भाव कमी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे तर शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे.

Published by: sachin Salve
First published: November 4, 2020, 11:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या