कांदा झाला शंभरी पार, पण इथं मिळतोय अजूनही सर्वात स्वस्त!

कांदा झाला शंभरी पार, पण इथं मिळतोय अजूनही सर्वात स्वस्त!

कांद्याच्या दिवसेंदिवस वाढत्या दराला लगाम लावण्यासाठी केंद्र शासनाने आणखी एक पाऊल उचललंय.

  • Share this:

मनमाड, 04 डिसेंबर : कांद्याच्या दरानं शंभरी कधीच ओलांडली आहे. मात्र 50 ते 60 रुपये दरानंही कांदा विकत मिळतोय. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

तुमच्या आवडीचा ठसकेबाज कांदा एकशेवीस रुपये प्रति किलो नव्हे तर 60 रुपये किलो या दरानं मिळत आहे. चवदार कांदा डोळ्यात पाणी आणतोच. पण या वेळी कांदा महागल्यानं डोळ्यात पाणी आलंय. पण कांद्याची ही दरवाढ दलाल आणि नफेखोरांनी केली आहे. मनमाडमधल्या विक्रेत्यांना जो कांदा स्वस्तात मिळतो तो कांदा जास्त दरानं मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये विकला जात आहे.

बाजार समित्यांमध्ये येणारा कांदा हा मध्यम आणि हलक्या प्रतीचा आहे. त्यामुळे कांद्याला सरासरी 7 हजार ते कमीत कमी 2 हजार रुपये भाव मिळत आहे.  हाच कांदा छोट्या शहरातून मोठ्या शहरात पाठवला जात आहे. मोठ्या शहरात जाताना कांद्याची होणारी मोठी दरवाढ कशी होते, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

कांदा साठवणुकीला लगाम

दरम्यान, कांद्याच्या दिवसेंदिवस वाढत्या दराला लगाम लावण्यासाठी केंद्र शासनाने आणखी एक पाऊल उचललंय. होलसेल व्यापाऱ्याला कांदा साठवणुकीची पन्नास मेट्रिक टनाची असलेली मर्यादा 25 मेट्रिक टन केली  आहे. तर किरकोळ व्यापाऱ्यांची दहा मेट्रिक टन  मर्यादा पाच मेट्रिक टन करण्यात आली आहे. या अगोदर केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी, कांदा आयात, कांदा साठवणुकीवर मर्यादा आणि व्यापाऱ्यांवर छापे यांसारखी पाऊलं उचलल्यानंतरही कांद्याच्या भावात होत असलेली वाढ थांबलेली नाही.

Published by: sachin Salve
First published: December 4, 2019, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading