मोदी सरकारचा कांद्याबाबत मोठा निर्णय, तरीही शेतकरी नाराज

मोदी सरकारचा कांद्याबाबत मोठा निर्णय, तरीही शेतकरी नाराज

सरकारनं क्विंटल मागे जे 200 रुपये अनुदान जाहीर केले, त्यात वाढ करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे

  • Share this:

बब्बू शेख, प्रतिनिधी

मनमाड, 29 डिसेंबर : केंद्र सरकारनं कांदा निर्यातीच्या अनुदानात वाढ केल्यानंतर व्यापारी आणि बाजार समितीच्या सभापतींनी समाधान व्यक्त केलं आहे. तर या अनुदानाचा फक्त व्यापाऱ्यांना फायदा होणार, असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारनं क्विंटल मागे जे 200 रुपये अनुदान जाहीर केले, त्यात वाढ करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, कांद्याच्या भावात होत असलेली घसरणीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात अनुदानात 5 टक्क्यानं वाढ केली आहे. केंद्र शासनानं घेतलेल्या या निर्णयाचा कांदा निर्यातदार व्यापारी आणि बाजार समितीच्या सभापतींनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.

केंद्र शासनानं निर्यात अनुदानात जी वाढ केली आहे, त्याचा फायदा हा व्यापाऱ्यांना होणार असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त करून, "आम्हाला दिलासा द्यायचा असेल तर शासनाने प्रति क्विंटल 200 रुपयाऐवजी किमान 500 रुपये अनुदान द्यावं", अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

===================

First published: December 29, 2018, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading