शेतकऱ्याने स्वत:ला कांद्यातच गाडून घेतलं, बळीराजाची हतबलता दाखवणारा VIDEO

शेतकऱ्याने स्वत:ला कांद्यातच गाडून घेतलं, बळीराजाची हतबलता दाखवणारा VIDEO

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

  • Share this:

नाशिक, 18 फेब्रुवारी : कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने स्वतःला कांद्याच्या ढिगाऱ्यात गाडून घेतलं आहे.  मारुती मुंढे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते येवला तालुक्यातील पिंपळखुटे येथील रहिवाशी आहेत.

गेल्या चार महिन्या पासून कांद्याच्या भावात होत असलेली घसरण थांबता थांबत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत निराश झालेल्या  मारुती मुंढे यांनी स्वतःला कांद्याच्या ढिगात गळ्यापर्यंत गाडून आमरण उपोषण सुरू केले आहे.

कांद्याला हमीभाव द्यावा, शेतकऱ्याचे 2018 पर्यंत सर्व कर्ज माफ करावं तसंच 2019 पर्यंत सर्व वीज बिल माफ करण्यात यावं, अशा विविध मागण्यासाठी या शेतकऱ्याने हे आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्याने केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु अजूनही कांद्याच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाही.

निवडणुका येताच सर्वच राजकीय पक्ष हमीभावाचं आश्वासन देतात आणि नंतर मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फसवलं गेल्याची भावना आहे. आता येणाऱ्या काळात तरी कांद्याचे भाव वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करतं का, हे पाहावं लागेल.

Pulwama Encounter: 'बाबा तुमची वाट पाहत आहेत; चकमकीत अडथळा आणू नका'

First published: February 18, 2019, 4:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading