कांदा सफरचंदापेक्षाही झाला महाग, भाव आणखी वाढणार

कांदा सफरचंदापेक्षाही झाला महाग, भाव आणखी वाढणार

नाशिकमध्ये चांगल्या दर्जाच्या कांद्याचं उत्पादन होतं पण पावसामुळे हे पीक हातात यायला उशीर आहे. याआधी दिवाळीच्या आधी कांद्याची साठवण व्हायची पण आता ती दिवाळीनंतर होणार आहे.

  • Share this:

नाशिक, 23 सप्टेंबर : नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.कांदा दरात चक्क एका रात्रीत साडेबाराशे रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मोठी मागणी वाढल्यानं शेतकरी आनंदात आहे. केंद्रीय समितीनं पाहणी करून दर अधिक वाढतील असा अहवाल सादर केलाय.पावसामुळे कर्नाटक, मध्यप्रदेश आणी आंध्रप्रदेशात कांदा पिकाला मोठा फटका बसला होता. आता मात्र कांद्याच्या भावात तेजी राहील, असा केंद्रीय समितीचा निष्कर्ष आहे.

ग्राहकांना मात्र याचा फटका बसणार आहे. घाऊक बाजारात कांद्याचे भाव 60 ते 70 रुपये किलोपर्यंत गेलेत. कांदा सफरचंदापेक्षाही महाग झालाय. सिमल्यामध्ये सफरचंदाच्या किंमती 30 रुपये किलोपासून सुरू होतात. कांदा मात्र 60 रुपये किलोने घ्यावा लागतोय.मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात जोरदार पाऊस पडल्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आणि त्यामुळेच दरांमध्ये ही वाढ झाली.

दिवाळीनंतर पीक हातात येणार

नाशिकमध्ये चांगल्या दर्जाच्या कांद्याचं उत्पादन होतं पण पावसामुळे हे पीक हातात यायलाही उशीर आहे. याआधी दिवाळीच्या आधी कांद्याची साठवण व्हायची पण आता दिवाळीनंतर होणार आहे. म्हणजेच कांद्याचं पीक यायला एक महिना उशीर आहे.

हेही वाचा : अज्ञात माथेफिरुने कांदा चाळीत टाकला 'युरिया', 120 क्विंटल कांद्याची नासाडी

पाकिस्तान, इजिप्त या देशातून भारतात कांदा आणला जाणार आहे. हा कांदा 15 ऑक्टोबरपर्यंत येईल. त्यानंतर मात्र कांद्याचे भाव खाली येऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कांद्याचे भाव नियंत्रित राहावेत यासाठी कांद्याच्या साठवणुकीलाही आळा घालावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. कांद्याच्या साठवणुकीमुळे दरात वाढ होतेय. घाऊक बाजारात कांदे 15 ते 20 रुपये किलोने विकले जायचे. आता हे दर 48 रुपयांवर गेले आहेत.

=======================================================================================

VIDEO: 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करण्यामागे वेगळा मनसुबा? मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शंका

Published by: Arti Kulkarni
First published: September 23, 2019, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading