मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सांगली: डोंगरावर एका तरुणासह 2 तरुणींचा आढळला मृतदेह; घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंनी वाढवलं गूढ

सांगली: डोंगरावर एका तरुणासह 2 तरुणींचा आढळला मृतदेह; घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंनी वाढवलं गूढ

Crime in Sangli: सांगली जिल्ह्याच्या तासगाव परिसरातील एका डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींचा मृतदेह आढळल्याची (one young man and 2 women found dead) धक्कादायक घटना समोर आली आहे.

सांगली, 23 डिसेंबर: सांगली (Sangli) जिल्ह्याच्या तासगाव परिसरातील एका डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींचा मृतदेह आढळल्याची (one young man and 2 women found dead) धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच ठिकाणी तिघांचे अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मृतदेहाजवळ काही चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार (found chocolate, bouquet and garland) अशा वस्तू आढळल्या आहेत. त्यामुळे संबंधित तिघांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काही घातपात घडला याबाबत गूढ निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीतील शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर घडली आहे. याठिकाणी एका तरुणाने आणि दोन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. पण तिघांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला.

हेही वाचा-बाप नजरेआड होताच साधला डाव; मुलीसोबत क्रूरतेचा कळस, भयावह स्थितीत आढळली तरुणी

हरीश हणमंत जमदाडे असं संबंधित 21 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो मणेराजुरी येथील रहिवासी आहे. तर यामध्ये मृत पावलेल्या दोन्ही तरुणी कवठेमहांकाळ तालुक्यातील जयगव्हाण येथील रहिवासी आहेत. पण गेल्या काही काळापासून दोघीही मणेराजुरी याच ठिकाणी वास्तव्याला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर एका युवतीची अद्याप ओळख पटली नाही.

हेही वाचा-चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी द्राक्ष बागेत फवारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी द्रव्याची बाटली सापडली आहे. संबंधित तिघांनी बुधवारी रात्री हे विषारी द्रव्य प्राशन केलं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तिघांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र एकाच ठिकाणी दोन तरुणी आणि एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Sangli