Home /News /maharashtra /

खेळता खेळता गेला बाथरूममध्ये अन् पडला पाण्याने भरलेल्या बादलीत, भिवंडीत चिमुकल्याच्या मृत्यूनं हळहळ

खेळता खेळता गेला बाथरूममध्ये अन् पडला पाण्याने भरलेल्या बादलीत, भिवंडीत चिमुकल्याच्या मृत्यूनं हळहळ

भिवंडीत (Bhiwandi) एक दुर्देवी घटना घडली आहे. ाप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात (Bhoiwada police station) अकस्मीत मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

भिवंडी, 03 जानेवारी: भिवंडीत (Bhiwandi) एक दुर्देवी घटना घडली आहे. पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात (Bhoiwada police station) अकस्मीत मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिलकैश अन्सारी असे मृत्यू झालेल्या बाळाचं नाव आहे. भिवंडी शहरातील देव नगर परिसरात ही घटना घडली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी घरातील एक वर्षाचा चिमुकला खेळता खेळता बाथरूममध्ये गेला. बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेही वाचा- मुंबईत Corona चा विस्फोट! बाधितांची संख्या चिंता वाढवणारी; Lockdown निश्चित? याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एक वर्षांच्या दिलकैश अन्सारी असे मृतक चिमुरड्याचं नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कशी घडली घटना मृतक चिमुरडा हा भिवंडीतील देवनगर भागातील एका घरात कुटुंबासह राहत होता. घटनेच्या वेळी मृत चिमुकल्याची आई किचनमध्ये जेवण बनवत होती. तर त्यांची इतर मुले घरात हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती. त्यावेळी खेळता खेळता चिमुरडा बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला आणि त्यातच या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेही वाचा- सडपातळ मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात विकी कौशलच्या फिटनेस टिप्स; हे आहे त्याच्या Athletic Body चं सीक्रेट, पाहा PHOTOS  मृत दिलकैश अन्सारी याला 6 भावंडं असून तो सर्वात लहान होता. या प्रकरणी मृतकची आई शबाना अन्सारी (वय 29 वर्ष ) यांच्या तक्रारी वरून भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आता पोलीस तपासाअंती नेमकी घटना कशी घडली याचे सत्य समोर येणार आहे. तर दुसरीकडे लहान चिमुरड्यांवर मातापित्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे हेच या घटनेवरून दिसून येत आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bhiwandi

पुढील बातम्या